👁 8 Views

सोलापूर-कुक्कुट व्यवसायासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..

पंढरपूर Live 3 August 2017

सोलापूर दि.3:- एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यात परसबाग कुक्कुट व्यवसाय विकसित करण्यासाठी 50 टक्के अनुदान तत्वावर तलंगा गट (25+3) वाटप योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेतून प्रती लाभार्थी सुधारित कुक्कुट जातीची 8-10 आठवड्याची 25 मादी  व 3 नर असा 28 पक्षांचा एक गट असे 1166 गट वाटप करण्यात येणार आहेत  या योजनेचे विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तालुक्यातील पंचायत समिती मध्ये पशुधन अधिकारी (विस्तार) यांच्याकडे उपलब्ध आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2017 पर्यंत आहे.
 या योजनेचा लाभ सर्वसाधारण गटातील लाभार्थी घेवू शकतील. एका कुटूंबातील एकाच व्यक्तीस लाभ मिळेल. तसेच 30 टक्के महिला लाभार्थींना प्राधान्य देण्यात येईल. महिलांनी जास्तीत जास्त अर्ज सादर करावेत. कुक्कुट पालन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थींना प्राधान्य दिले जाणार असून दारिद्य्र रेषेखालील लाभार्थी, भूमिहीन, शेतमजूर, मागासवर्गीय, अत्यल्प, अल्प भूधारक अशा प्रमाणे प्राधान्यक्रम असणार आहे. तसेच अपंगांना 3 टक्के आरक्षण देण्यात येणार आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, सोलापूर यांनी कळविले आहे.

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *