👁 8 Views

चंद्रभागेत ना पाणी ना कुठल्या मिळतात सोयी..! महाराज मंडळींना मात्र समितीवर जाण्याचीच झालीय घाई!!

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..

पंढरपूर Live 4 August 2017

पंढरपूर (प्रतिनिधी):- ना चंद्रभागेत मिळतय पाणी ना मिळतात कुठल्या सोयी..! पण महाराज मंडळींना मात्र समितीवर जाण्याचीच लय झालीय घाई..!! असंच कांहीसं चित्र आज पंढरीत पुत्रदा एकादशीच्या दिवशी पहावयास मिळालं. आज आषाढी एकादशी नंतरची पहिली महिना वारी पंढरीत भरलेली होती. लाखो वारकरी पंढरीत विठ्ठलाच्या भेटीसाठी आलेले होते. परंतु चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी स्वच्छ पाणी नव्हतं. पाय धुण्याएवढं पाणी ते सुध्दा घाण पाणी वारकर्‍यांच्या नशिबी आज आलेलं असताना याबाबतीत चक्कार शब्द न बोलता कांही वारकरी संघटनांच्या नेत्यांनी विठ्ठल मंदिरासमोर आंदोलन केले. बरं हे आंदोलन कशासाठी? तर मंदिर समिती बरखास्त करा अन् आम्हाला मंदिर समितीवर घ्या म्हणून..!!  एकादशीच्या पवित्र दिवशी श्रीविठ्ठलाचे दर्शनाला आणि चंद्रभागेच्या स्नानाला वारकरी सांप्रदायात अतिशय महत्व असते. परंतु वारकरी संघटनांच्या तथाकथीत नेते मंडळींनी पंढरीत आलेल्या भोळ्या-भाबड्या वारकर्‍यांची दिशाभुल करुन आपल्या स्वार्थापोटी चालु असलेल्या आंदोलनात त्यांना गुंतवण्याचे घोर पाप केले आहे. 
महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने आम्ही या प्रसिध्दीपत्राद्वारे जाहीर करतो की, ही वारकरी संघटनांची तथाकथीत नेते मंडळी चंद्रभागेचे स्नान करत नाहीत तर अलिशान बाथरुममध्ये आंघोळी करतात!! त्यांना चंद्रभागेच्या पात्राची ओढ आणि तिच्या पावित्र्याची दखल घेण्याची सद्बुध्दी पांडुरंगाने द्यावी व स्वत:चा स्वार्थ विसरावा..! यासाठी आज महर्षी वाल्मिकी संघाचे पदाधिकारी व सर्वसामान्य वारकरी भाविक यांनी चंद्रभागेच्या पात्रात वारकरी संघटनांच्या नेते असणार्‍या महाराज मंडळींच्या आज झालेल्या आंदोलनाचा निषेध व्यक्त करत वारकरी संघटनांच्या नेते असणार्‍या महाराज मंडळींनी चंद्रभागेच्या पावित्र्यासाठीही आंदोलन करावं हे सुचवण्यासाठी प्रती आंदोलन केलं. हातामध्ये,  ‘‘चंद्रभागेत प्रचंड घाणीचं साम्राज्य! हे तुम्हाला दिसत नाही का?, चंद्रभागेत मिसळते मटण व मैलामिश्रीत घाण पाणी!, भाविकांना चंद्रभागेत स्नान करण्यास नाही पाणी..!! चंद्रभागेत नाही पुरेसे पाणी आणि वारकरी संघटनेला समितीवर जाण्याची झालीय घाई..! चंद्रभागेतील वाळु चोरी कधी थांबणार? चंद्रभागेच्या पाण्यावर तरंगते शेवाळे कधी काढणार?’’ असे फलक घेऊन व वारकर्‍यांची दिशाभुल करणार्‍या वारकरी संघटनांच्या नेत्यांच्या निषेधाच्या घोषणा देत आंदोलन केले.
यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव, ह.भ.प. प्रदीप महाराज ढेरे, शहाजी पवार, माऊली भजनी मंडळ, शेंटचिंच, उत्तम परचंडे, बबलु बोराळकर, गणेश तारापूरकर, महावीर अभंगराव, अमर परचंडे, विनायक परचंडे, भैया कांबळे, संपत सर्जे, हमा कोरे तसेच वारकरी बांधव, वासुदेव, महिला वारकरी भाविक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *