👁 6 Views

विद्यार्थ्यांना केंद्र बिंदू मानून राबवीत असलेले स्वेरीचे सर्व उपक्रम कौतुकास्पद

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..

पंढरपूर Live 5 August 2017

 उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलुगुरू प्रा. डॉ.पी.पी. पाटील यांचे स्वेरीत स्वागत व सत्कार करताना संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे सोबत डावीकडून सोलापूर विद्यापीठ परीक्षा नियंत्रक व मुल्यांकन विभागाचे संचालक डॉ.बी.पी.पाटील, रसायन शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. ए.ए. घनवट. प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख डॉ. एस.ए. लेंडवे, डॉ.एम.एम.पाटील व आदी  
                               
  जळगावविद्यापीठाचे कुलुगुरू डॉ.पी.पी. पाटील
जळगाव विद्यापीठाचे  कुलुगुरू प्रा.डॉ.पी.पी. पाटील यांची श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युटला सदीच्छा भेट
 
पंढरपूर- ‘सोलापूर जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रातील अभियांत्रिकी क्षेत्रात होत असलेली चर्चा पाहून  शैक्षणिक विठ्ठलाला देखील भेट देण्याचे ठरविले आणि खरोखरच स्वेरी मधील विध्यार्थ्यांना शिकविण्याची पद्धत, विद्यार्थ्यांना केंद्र बिंदू मानून राबवीत असलेले सर्व शैक्षणिक व सामाजिक उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहेत. विद्यार्थ्यांची अभ्यासाविषयी असणारी आत्मीयता, प्राध्यापकांचा उत्साह, विद्यार्थ्याच्या अभ्यासासाठी असणारी मुबलक व आवश्यक पुस्तके व साहित्य, सोयी, सुविधा आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे संपूर्ण कॉलेज कॅम्पसमध्ये असणारी शिस्त यामुळेच कदाचित विद्यार्थ्यांनी स्वेरीलाच प्रथम प्राधान्य दिले आहे. स्वेरी ही भविष्यात राज्यात देखील आघाडी घेण्याची चिन्हे आहेत.’ असे प्रतिपादन जळगाव मधील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलुगुरू प्रा. डॉ.पी.पी. पाटीलयांनी केले.
       जळगाव मधील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलुगुरू प्रा. डॉ.पी.पी. पाटीलयांनी सोलापूर जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात गरुड भरारी मारलेल्या गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युटला नुकतीच सदीच्छा भेट देवून तेथील शिक्षण पद्धतीची माहिती घेतली व अभियांत्रिकी क्षेत्रात होत असलेली चौफेर प्रगती पाहून समाधान व्यक्त केले. त्यांच्या समवेत सोलापूर विद्यापीठातील परीक्षा नियंत्रक व मुल्यांकन विभागाचे संचालक डॉ.बी.पी.पाटील, सोलापूर विद्यापीठातीलरसायन शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. ए.ए. घनवट व विद्यापीठाचे पदाधिकारी व अधिकारी वर्ग उपस्थित होते. प्रारंभी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. संस्थेची वाटचाल सांगून स्थापनेपासून मिळाली मानांकने, वार्षिक परीक्षेचा निकाल, कॅम्पस प्लेसमेंट मधून नोकरीस लागलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी, आर.एच. आर.डी.एफ. या संशोधन विभागातील संशोधने व विकसित बी, बियाणे व त्यासाठी मिळालेला निधी, अद्यावत मशीन्स, विविध विभाग, वर्कशॉप, आदी विभागांना पाहुण्यांनी भेटी दिल्या व सखोल माहिती जाणून घेतली. प्रथम वर्षाच्या निकालाचे तर त्यांनी खूप स्तुती केली. शैक्षणिक धोरण व विद्यार्थ्यांचा होणारा विकास पाहून कुलगुरू डॉ. पाटील पुढे म्हणाले, ‘असेच शैक्षणिक कार्य सुरु राहिले तरअल्पावधीतच महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात स्वेरी टॉपवर असेल.’ असे सांगून त्यांनी सर्व उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांच्या समवेत डिप्लोमा इंजिनीअरींगचे प्राचार्य प्रा. एन.डी.मिसाळ, अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, अधिष्ठाता डॉ.एम.एम.पाटील, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख डॉ. एस.ए. लेंडवे, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
 
संशोधन विभागाची माहिती जाणून घेताना जळगाव मधील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलुगुरू प्रा. डॉ.पी.पी. पाटील, सोबत डावीकडून सोलापूर विद्यापीठपरीक्षा नियंत्रक व मुल्यांकन विभागाचे संचालक डॉ.बी.पी.पाटील, रसायन शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. ए.ए. घनवटसंस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे व प्राध्यापक वर्ग.

…………………..From-
Shri. Santosh  C. Halkude
Pandharpur – 413 304. 
Mob: 9545 55 36 28, 
          9850 24 21 55 .………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *