पंढरीत कालिकादेवी चौकातील घराला आग…
पंढरीच्या कालिका देवी चौकातील इस्माल बागवान यांच्या घराला आग लागल्याची दुर्घटना आज दुपारी १२:३० वाजण्याच्या दरम्यान घडली.
कालिकादेवी चौक हा पंढरीतील प्रदक्षिणा मार्गावरचा प्रमुख वर्दळीचा चौक आहे. ऐन चौकातीलच एका वास्तुला आग लागून धुराचे लोट वाहु लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. हे वृत्त समजताच अग्निशामक दलाने आणि पोलिसांनी तात्काळ ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. शाॅर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समजते.



