पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
गणेशोत्सवानिमित्त तयारीचा मुख्यमंत्री देवेंद्र फ
दि. 7 ऑगस्ट, 2017
दि. 7 ऑगस्ट, 2017
दि. 7 ऑगस्ट, 2017
दि. 7 ऑगस्ट, 2017
दि. 7 ऑगस्ट, 2017
दि. 7 ऑगस्ट, 2017
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 7 August 2017
गणेशोत्सवानिमित्त तयारीचा मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस यांनी घेतला आढावा
गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी
पोलिसांनी संवेदनशील रहावे – मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई, दि. 7 – राज्यातील गणेशोत्सव हा पारंपरिक उत्सव असल्यामुळे तो शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी पोलीस विभागाने संवदेनशील राहून सुरक्षेचे उपाय योजावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. तसेच गणेशोत्सव मंडळांना सर्व परवाने ऑनलाईन देण्यासंदर्भात राज्यातील सर्व आयुक्तालयांनी कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या..
पारंपरिक गणेशोत्सवाच्या तयारीचा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज आढावा घेतला. यावेळी मुंबईचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री (ग्रामीण ) दिपक केसरकर, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच आयुक्त अजोय मेहता यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर, जयेंद्र साळगावकर आदी उपस्थित होते.
गणेश स्थापना तसेच विसर्जन काळात योग्य त्या उपाय योजना राबविण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना यावेळी दिले. तसेच या काळात राज्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सुरक्षेचे उपाय योजण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. या काळात नियमांचे पालन करून गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याच्या सूचना पोलीसांनी गणेश मंडळांना द्याव्यात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबईमधील गणेश मूर्तींच्या उंचीसंदर्भात गणेश मंडळांनी व समन्वय समितीने जनजागृती करावी. तसेच मुंबईतील वाहतूक कोंडी व नागरिकांची गैरसोय टाळावी, यासाठी स्थापनेसाठी गणेशमूर्ती सुट्टीच्या दिवशी आणावी, अशा सूचना पोलीसांनी सर्व सार्वजनिक गणेशमंडळांना द्याव्यात, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मुंबईत सध्या मेट्रोची कामे सुरू आहेत. यामुळे वाहतूक पोलीस विभागाने गर्दीचे व्यवस्थापन योग्यरितीने करावे. तसेच मंडळांना लागणारे सर्व परवाने ऑनलाईन देण्यासंदर्भात सर्व आयुक्तालयांनी कार्यवाही करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
यावेळी पोलीस महासंचालक श्री. माथूर यांनी पोलीस विभागामार्फत करण्यात आलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.
०००
नंदकुमार वाघमारे/विभागीय संपर्क अधिकारी/7.8.2017
वृ. वि. 6318 13 श्रावण, 1939 (दु.1.00 वा.)
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात
ग्रामविकास सचिव असिम गुप्ता यांची मुलाखत
मुंबई, दि. 7- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘ग्रामविकास विभागाच्या विविध योजना’ या विषयावर ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारीत होणार आहे. ही मुलाखत मंगळवार, दि. 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत प्रसारीत होणार आहे. मुलाखतकार हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
ग्रामविकास विभाग हा राज्य शासनाचा अत्यंत महत्वपूर्ण विभाग आहे. या विभागामार्फत विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. ग्रामपंचायतींना लागू झालेला सेवा हक्क अधिनियम नेमका काय आहे तसेच पंडीत दीनदयाळ उपाध्याय योजनेंतर्गत घरकुलासाठी अर्थसहाय्य योजना आदी ग्रामविकास विभागाशी निगडित विषयांची माहिती श्री. गुप्ता यांनी जय महाराष्ट्र कार्यक्रमातून दिली आहे.
०००
वृ. वि. 6319 13 श्रावण, 1939 (दु.3.00 वा.)
ग्राम सामाजिक परिर्वतन अभियानासाठी
9 कोटी 21 लाख रुपयांचे धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द
मुंबई, दि. 7 : ग्राम सामाजिक परिर्वतन अभियानांर्तगत गावांचा सर्वांगीण विकासासाठी सी.एस.आर फंडाच्या माध्यमातून एकूण 9 कोटी 21 लाख रुपयांचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज सह्याद्रीगृह येथे विविध कंपन्यांच्या प्रमुखांनी यांनी सुपूर्द केले.
यात तसेच हिंदुस्थान युनि लिव्हर या कंपनीकडून रुपये 8 कोटीचा धनादेश तसेच स्वदेश फांऊडेशनच्या वतीने एक कोटी तर सिस्का एलईडी कंपनीकडून रुपये 21 लाखाचा धनादेश असे एकूण 9 कोटी 21 लाख रुपयांचे धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आले.
सिस्का एलईडी कंपनीच्या वतीने प्रत्येक महिन्याला पाच गावात मोफत एलईडी लाईट्स बसविण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
यावेळी ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे प्रमुख व मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रम्हण्यम, कार्यक्रम व्यवस्थापक सागर शिर्के, युवराज सासवडे, हिंदुस्थान युनिलिव्हरचे व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता, सीएसआरचे प्रमुख प्रसाद प्रधान, स्वदेश फांऊडेशनचे रॉनी व झरिना स्क्रुवाला, सिस्का एलईडी कंपनीचे एमडी राजेश उत्तम चंदानी, गोविंद उत्तम चंदानी आदि उपस्थित होते.
वृ. वि. 6320 13 श्रावण, 1939 (दु.3.30 वा.)
डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या ‘प्रकाशवाटा’ या
आत्मचरित्राच्या संस्कृत आवृतीचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई, दि. 7 : ‘प्रकाशवाटा’ या डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या आत्मचरित्राच्या संस्कृत आवृतीचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले.
याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, डॉ. मंदाताई आमटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, सदगुरु ट्रस्टचे विलास महाडीक, नाना पालकर संस्थेचे कृष्णा महाडीक आदि मान्यवर उपस्थित होते.
डॉ.प्रकाश आमटे यांच्या मुळ मराठी आत्मचरित्राचा संस्कृत अनुवाद मंजुषा कुलकर्णी यांनी केला असून हे पुस्तक मेनका प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले आहे.
०००
वृ. वि. 6321 13 श्रावण, 1939 (दु.4.00 वा.)
‘पुस्तक स्वच्छ सवयीचे’ या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते प्रकाशन
मुंबई, दि. 7 : स्वच्छतेविषयी मुलांमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने ‘स्वच्छ सवय स्वच्छ भारत’ या कार्यक्रमांतर्गत हिंदुस्थान युनि लिव्हर कंपनीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘पुस्तक स्वच्छ सवयीचे’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले.
या प्रसंगी शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, हिंदुस्थान युनिलिव्हरचे व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता आदि मान्यवर उपस्थित होते.
००००
वृ. वि. 6322 13 श्रावण, 1939 (दु.4.00 वा.)
रक्षाबंधनानिमित्त राज्यातील शेतकरी
भगिनींनी बांधली मुख्यमंत्र्यांना राखी
मुंबई, दि. 7 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रक्षाबंधनानिमित्त राज्यातल्या विविध भागातून आलेल्या शेतकरी भगिनींनी आज वर्षा निवासस्थानी औक्षण करुन त्यांना प्रातिनिधीक स्वरुपात राखी बांधली व शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा महत्वपुर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. हा एक उपाय आहे परंतु शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत आणि शेतकरी समृद्ध होईपर्यंत हा लढा चालू राहील. कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीत आपले सरकारच्या माध्यमातून फॉर्म भरावा असे सांगून त्यांनी सर्व महिला शेतकरी भगिनींना रक्षाबंधनानिमित शुभेच्छा दिल्या.
०००
वृ. वि. 6323 13 श्रावण, 1939 (दु.4.00 वा.)
रक्षाबंधनानिमित्त अल्पसंख्यांक भगिनींनी बांधली मुख्यमंत्र्यांना राखी
मुंबई, दि. 7 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्षाबंधनानिमित्त भाजपा अल्पसंख्यांक महिला मोर्चाच्या वतीने आज वर्षा निवासस्थानी राखी बांधली व शुभेच्छा दिल्या.
या महिलांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रुपये 21 हजाराचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला, यावेळी महिला खान शमिप बानो, शबाना आजम, रिझना आझम, आलिया शेख, फातमा सिद्दीकी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली, यावेळी डॉ.हैमद राणा, हाजी हैदर आझम, वसीम खान, मुनाफ पटेल आदी उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111






