👁 9 Views

नगरपरिषदांमधील कर्मचारी २१ ऑगस्ट रोजी बेमुदत संपावर जाणार…

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..


पंढरपूर Live 8 August 2017

महाराष्ट्रसह सोलापूर जिल्ह्यातील १२ नगरपरिषदांमधील कर्मचारी दि.९ ऑगस्ट रोजी  एक दिवसाच्या सामुहिक रजेवर जाणार व दि,२१ ऑगस्ट २०१७ रोजी बेमुदत संपावर जाणार.

      महाराष्ट्रातील ३३० नगरपरिषद कर्मचा-यांच्या विविध मागण्यांबाबत व नगरपरिषद कर्माचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करावा  या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात येणा-या आंदोलनाच्या तयारीसाठी आज लाल बावटा कार्यालय सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद समन्वय समितीचे जनरल सेक्रेटरी सुनिल वाळूजकर व जिल्हाध्यक्ष कॉ.सिध्दप्पा कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली नानासो वाघमारे माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी राज्याचे सिटूचे सचिव एम.एच.शेख यांचे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

       यावेळी बोलताना राज्याचे जनरल सेक्रेटरी यांनी सांगितले की,महाराष्ट्रातील ३३० नगरपरिषद/नगरपंचायत मधील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करावा.अनुकंप व वारसा हक्काची विना शर्ती अटी भरती  चालू करावी रोजंदारी व ठेकेदारी कर्मचा-यांना समान काम समान वेतनप्रमाणे वेतन मिळावे व त्यांना सेवेत कायम करावे.ग्रामपंचायचीचे  नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये रुपांतर झालेल्या सर्व नगरपरिषदां मधील सर्व   कर्मचा-यांचे विना अट विना शर्त पुर्वीप्रमाणेच त्या-त्या पदावर समावेशन करावे व नगरपरिषद कर्मचा-यांना २४ वर्षची कालबद्द लागू करावी व इतर मागण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका/नगरपंचायत कर्मचारी,संवर्ग कर्मचारी सफाई कामगार रोजंदारी कर्मचारी मुख्याधिकारी संघटना या सर्व संघटनेच्यावतीने नगरपरिषद कामगार संघटनांची एक संयुक्त संघर्ष समिती तयार करणेत आली असून दि,९ ऑगस्ट २०१७ रोजी १ दिवस सामुदायिक रजेवर  जाऊन काम बंद आंदोलन करणेत येणार आहे.तसेच दि,१० ऑगस्ट ते दि,१४ ऑगस्ट २०१७ रोजी काळ्या फिती लावून काम करणेत येणार आहे. 

दि,१५ ऑगस्ट २०१७ रोजी जिल्ह्यातील पालकमंत्री,खासदार,आमदार यांना निवेदन देणे व दि,२१ ऑगस्ट २०१७ रोजी बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेणेत आला आहे.त्यानुसार सर्व कर्मचा-यांनी आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन कॉ.सिध्दप्पा कलशेट्टी यांनी केले आहे.यावेळी सोलापूर जिल्ह्यातील १२ नगरपरिषदेचे कामगार संघटनेचे पदाधिकारी महादेव कांबळे प्रदिप शिंदे अमोग पारशेट्टी (करमाळा) शरद वाघमारे, सुनिल बोडके, अनिल अभंगराव,संजय माने,सुनिल सोनार,शरद कुलकर्णी  (पंढरपूर) अमर शिंदे धनराज कांबळे (अकलक्कोट), नागेश लामतूरे (बार्शी), दत्ता इंगळे राम पवार (मंगळवेढा), बाळू पायगन अशोक पलंगे (कुर्डूवाडी),राजाभाऊ बागवान,भिम भगवान किरगल (मैंदर्गी), दत्ता कुर्डे (माढा), निलेश कस्तुरे (माळशीरस),दिलीप जाधव,अरुण मांडवे,तानाजी कसबे (मोहोळ),रमेश पाटणे,संजय दौंडे,वसंत गलीयल, (सांगोला), हे उपस्थीत होते.      
                                                                                                                       
                                                                                                                    
सुनिल वाळुजकर                                                                                                                        (जनरल सेक्रेटरी)

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *