👁 9 Views

चाकण: पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

 

आरोपी आपल्या मयत पत्नीचा वारंवार मानसिक व शारिरीक छळ करत असे. 


कपडे घालणे, बांगड्या घालणे यावरून तसेच सासऱ्यांना औषधासाठी पैसे गावी पाठवण्यासारख्या किरकोळ कारणावरून वाद घालत असे अखेर सततच्या भांडणाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे.


रोहित सुरेश बेडगे (वय 29 रा. चाकां सौंदर्य सोसायटी) असे आरोपीचे नाव असून प्रवीण गोविंद कोरे (वय32 रा.खरशिंग ) यांनी फिर्याद दिली आहे.


फिर्यादीचा आरोपानुसार आरोपी रोहित ने फिर्यादीच्या बहीणीचा मानसिक व शारीरिक छळ करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. याप्रकरणी चाकण पोलीसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *