👁 11 Views

गोपाळपूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील १३ विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कंपनीत इंटरव्युवद्वारे निवड

गोपाळपूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील १३ विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कंपनीत इंटरव्युवद्वारे निवड

 


पंढरपूरः- दिवगी वार्नर, फ्रोशिया, बॉश, इंटरफेस डीझाईइन, इंडीट्रोनिक्स व बीटूबी या ६ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील  इंजिनीअरिंगच्या चारही विभागातील १३ विद्यार्थ्यांची इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
          पुणे येथील दिवगी वार्नर, फ्रोशिया, बॉश, इंटरफेस डीझाईइन, इंडीट्रोनिक्स व बीटूबी या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीचे प्रमुख एच.आर गोपाल दळवी, विश्वास काजरेकर, जतीन सुळे, श्रीनिवासन अय्यर केशव, प्रणोती खरवडे, चांदणी बलवाणी व त्यांच्या निवड समितीने घेतलेल्या इंटरव्यूवमध्ये गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीतून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक अभ्यासाबरोबरच कमालीची शिस्तआदरयुक्त संबंध व उत्कृष्ट शिक्षण पध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावित झाली. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून अभियांत्रिकीच्या मेकॅनिल इंजिनीअरिंग, कॉम्पुटर सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग व इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलीकॉम्युनिकेशन इंजिनीअरिंग या तीन विभागातील मिळून प्रतिक कुलकर्णी,आशुतोष कटारे, काजोल कदम, शुभम खटवटे, सुहास बागल, रुपाली बाबर, शंकर गायकवाड, वैभव पुकाळे, प्रशांत सरवदे, अमोल जाधवर, तुळशीदास हुंडेकरी, शुभम वालावडकर, व प्रेरणा मुनुरेड्डी या १३ विद्यार्थ्यांची निवड कंपनीत झाली. श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटचे प्रमाण अधिक गतीने वाढत असून कंपनीस पात्र असे विद्यार्थी घडविले जात आहेत. त्यामुळे अनेक विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी स्थिर होवून आपले करिअर घडवीत आहेत. कंपनीला कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात याचा सखोल अभ्यास करूनमागणी तसा पुरवठाया  तत्वाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिस्तवर्तणूक, इतरांबरोबर भाषा संभाषण करताना आपली बॉडी लॅग्वेजकशी असावीअसा आदी नोकरीसाठी संबधित अभ्यास व ट्रेनिंग विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षकांद्वारे दिले जाते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ.माधव राऊळ व प्रा. एस.व्ही.दर्शने आदी प्राध्यापकांचे बहूमोल मार्गदर्शन लाभले असून संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष प्रा.सी.बी.नाडगौडा तसेच संस्थेतील विश्वस्तअधिष्ठाताविभागप्रमुख,प्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या निवडीमुळे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विषेशतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.  
छायाचित्र- संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे
  
From-
Shri. Santosh  C. Halkude
Pandharpur – 413 304. 
Mob: 9545 55 36 28, 

          9850 24 21 55 .

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *