सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 11 August 2017
पंढरपूर येथील रिमांड होम (बाल सुधार गृह) येथे ग्राहक पंचायत शाखा पंढरपूर च्या महिला विभागाच्या संघटक सौ. श्रद्धा बहिरट, डॉ. सपना फडे, डॉ. तृप्ती फडे, सौ. ज्योती खंडेलवाल, सौ. देशपांडे यांच्या सहकार्याने आणि ग्राहक पंचायत शाखा पंढरपूर चे सचिव दिनेश खंडेलवाल यांच्या वतीने रक्षा बंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच या वेळी जिल्हा अध्यक्ष डॉ. राजेश फडे यांनी त्यांचे वडील डॉ. आर. बी. फडे यांच्या स्मृती दिनानिमित्त बाल सुधार गृहातील सुमारे ५० बालकांना पादत्राणे (चप्पल) वाटप केले तर येथीलच कै. अनंतरावजी पंढरीनाथ बहिरट चारिटेबल ट्रस्ट, पंढरपूरच्या वतीने खाऊ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे विभागाचे सचिव – प्रा. गुरुनाथ बहिरट यांनी केले तर अध्यक्षस्थान राज्य कार्यकारिणी सदस्य प्र. वि. कुलकर्णी सर यांनी भूषविले. उपस्थितांचे स्वागत शहर अध्यक्ष नंदकुमार देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. राजेश फडे यांनी केले. कार्यक्रमास संजय कोकरे, डॉ. अनुप फडे, विशाल फडे, विपुल फडे, महादेव खंडागळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


