👁 7 Views

जळगाव: कारच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू , रामदेववाडीजवळ टायर फुटल्याने अपघात

 

जळगाव : जळगाव-पाचोरा रोडवर रामदेववाडीजवळ सुसाट कारच्या धडकेत दुचाकीस्वार शेतकऱ्याचा  मृत्यू झाला.


अपघातानंतर तरुणांनी मदतीला धाव घेतली अन्‌ स्वतःच्या पित्याचा मृतदेह बघून मुलाने आक्रोश करत हंबरडा फोडला.


रमेश मदन राठोड (वय ४५, रा. रामदेववाडी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. कारचालकाला वाहनासह ग्रामस्थांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत एमआयडीसी पोलिसांत रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.

पाचोऱ्याकडून जळगावकडे येत असलेल्या कार (एमएच १९, डीव्ही ७५१३) पुढे चालत असलेल्या दुचाकीस्वाराने (एमएच १९, डीझेड १६६०) गाव येण्यापूर्वीच युटर्न घेतला अन्‌ ब्रेक मारतानाच कारचे टायर फटून अनियंत्रित कार दुचाकीवर आदळली.


या अपघातात दुचाकीस्वार शेतकरी रमेश मदन राठेाड (वय ४५) दुचाकीसह फेकले गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. त्यांच्या दुचाकीच्या मागे बसलेल्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *