👁 7 Views

शनिशिंगणापुरचे दर्शन घेऊन निघालेल्या भाविकांचा भीषण अपघात , 3 जण ठार

 

अहमदनगर : पुणे अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला. देवदर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांचा हा अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.


अहमदनगर शहराच्या कामरगावमध्ये हा अपघात झाला आहे. या अपघातातील 11 जणांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. जखमींना शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


 अपघातात निधन झालेले सर्व शिरुर तालुक्यातील आमदाबाद गावचे रहिवाशी आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

आमदाबाद येथील 16 जण हे शनीशिंगापूरहून देवदर्शनाहून घेऊन माघारी परतत होते. पुणे अहमदनगर महामार्गावर भरधाव वेगाने पुण्याहून नगरकडे येणाऱ्या मालवाहू ट्रकने छोटा टेम्पो आणि कंटेनरला धडक दिली. बुधवारी मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. या भीषण अपघात 3 जण ठार झाले तर 11 जण गंभीर जखमी आहेत. 

मृतांमध्ये एका 14 वर्षीय बालकाचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवगड आणि शनिशिंगणापूरचे दर्शन घेऊन पुण्याकडे हे भाविक निघाले होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *