Pandharpur Live News Classified : उद्या पंढरपुरात विविध ‘त्वचारोग’ भव्य मोफत तपासणी शिबीर संपन्न होणार आहे. एक वर्षात पाच हजारांहून अधिक त्वचारोग रूग्णांवर यशस्वी उपचार करणारे लवटे स्किन क्लिनिक यांचेकडून हे आयोजन करण्यात आले आहे.
पंढरपुर मधील नवीन एस.टी. स्टॅन्ड शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये पहिल्या मजल्यावरील गाळा नंबर १४, १५ येथील लवटे स्किन क्लिनिक येथे उद्या शनिवार दिनांक १८ में २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत हे शिबीर संपन्न होणार असून या शिबीरात त्वचारोग तज्ज्ञ डॉ. प्रकाश मा. लवटे (MBBS/FCPS) व डॉ. भाग्यश्री सोनवर -लवटे (BAMS/SVD) यांचेकडून विविध त्वचा विकारांवरील अत्याधुनिक पध्दतीची मोफत तपासणी केली जाणार आहे.
या शिबीराचा लाभ घेण्यासाठी नावनोंदणी क्रमांक : 7020581457, 7620835385 या नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन डॉ. लवटे यांनी केले आहे.
शिबीरात खालील आजारांवर मार्गदर्शन व उपचार केले जातील.
त्वचारोग : गजकर्ण/नायटा, नागिण अंगाला खाज सुटणे, अंगावर चट्टे येणे, कोड, वांग, पिंपल, सोरायसिस, अंगावरील पांढरे डाग, पित्त उठणे, चिखल्या, इसब, तोंड येणे, नखांचे आजार
केश विकार : केस गळणे, केसांमधील कोंडा, टक्कल पडणे, पांढरे केस, कुष्ठरोग, गुप्तरोग, एडस्
पी.आर.पी. केमिकल पिलींग, चामखीळ, चरबीच्या गाठी, डर्मारोलर, मायक्रोनिडलिंग, हायड्राफेशियल
शिबीराची वैशिष्टे :
• मोफत तपासणी.
• मेडिकल बिलात ५% सवलत.
• सर्व प्रोसिजर्सवर ३० ते ५० % सवलत.
• साखरेची तपासणी मोफत.
• इतर रक्ताच्या तपासणीवर ५०% सवलत.
नाव नोंदणी केलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल.
नावनोंदणी क्रमांक : 7020581457, 7620835385