यावल तालुक्यातील किनगाव येथील इंदिरानगर भागातील रहिवाशी ६० वर्षीय वृद्धाची गळा चिरून निर्घृण हत्या झाल्याची बाब शुक्रवार, दि.
किनगाव, ता.यावल येथील इंदिरानगर भागातील रहिवासी भीमराव सोनवणे (६०) हे व्यवसायाने ट्रक चालक असून कामावरुन रात्री घरी परत आलेले नव्हते. तर शुक्रवारी सकाळी इंदिरानगर वस्तीच्या पुढील चुंचाळे रस्त्यावरील नाल्याच्या पुलाच्या खाली त्यांचा गळा कापलेला अवस्थेत मृतदेह शेतमजुरांना दिसून आला आणि खळबळ उडाली. मजुरांना गावात माहिती दिल्यानंतर यावल पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनास्थळी यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे, सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, असलम खान, भुषण चव्हाण हे पथकासह दाखल झाले. मयताच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून नातवंडे असा परीवार आहे. खूनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.



