👁 15 Views

भंडाऱ्याचे कार्यक्रमातील वादावरून युवकाचा निर्घृण खून

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 23 August 2017 

    येथील केदारेश्‍वर मंंदिरात श्रावणी अमावस्येनिमित्त सुरू असलेल्या भंडार्‍याच्या कार्यक्रमातील वादावादीचे पर्यावसन युवकाच्या खुनात झाले. सोमवारी रात्री 10.30 च्या सुमारास नवीन एस. टी. स्टँडसमोर असलेल्या हॉटेल शिवरत्नच्या दारात अज्ञात युवकांनी शंभू बबन बर्गे (वय 30) याचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, तपासासाठी त्यांना पुणे येथे नेण्यात आले आहे. याप्रकरणी मंदार आबासाहेब बर्गे यांनी दिलेल्या फिर्यादीत उपनगराध्यक्ष जयवंत पवार यांनीच शंभू बर्गे याचा गेम केला असल्याचे म्हटले आहे. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून तणावाचे वातावरण आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी, श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी ग्रामदैवत श्री केदारेश्‍वर मंदिरात भंडार्‍याचा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमादरम्यान केदारेश्‍वर नगरातील शुभम मोरे याचे कळकाई गल्लीतील करण बनकर याच्याबरोबर काही कारणांनी वादावादी झाली होती. त्यातून बनकर याने शुभम यास शिवीगाळ करत मारहाण केली. शुभम याने ही माहिती नातेवाईक मंदार बर्गे याला दिली.
    मंदार याने आपले मित्र अक्षय जगदीश बर्गे, अक्षय संजय बर्गे, शंभू बबन बर्गे व इतर 7-8 जणांना बरोबर घेऊन करण बनकर याच्याकडे गेला व त्याला जाब विचारला. भांडणे न करण्यासाठी त्याला समजावून देखील सांगत होता, करण बनकर याच्याबरोबर अर्जुन डेरे, बाबु शिंदे व दोन-तीन मित्र होते.
    त्यावेळी अर्जुन डेरे याने अक्षय जगदीश बर्गे याच्या उजव्या पायावर लोखंडी रॉड मारला. त्यामध्ये अक्षय जखमी झाला. करण बनकर याने शंभू बर्गे याच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. शंभू याने हल्ला चुकवला, त्यानंतर पुन्हा चाकूने वार केला. तो शंभू याच्या हाताला घासून गेला. या घटनेनंतर करण बनकर व त्याचे मित्र निघून गेले.
    जखमी अवस्थेतील अक्षय जगदीश बर्गे याला त्याचे मित्र शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. रात्री 9.30 च्या दरम्यान शंभू बर्गे याने रुग्णालयात जाऊन अक्षय याच्या प्रकृत्तीची विचारपूस केली. त्यानंतर तो नवीन एस. टी. स्टँडसमोर असलेल्या हॉटेल शिवरत्न येथे गेला. दरम्यानच्या काळात मोटारसायकलवरुन आलेल्या अज्ञात युवकांनी शंभू याच्या पाठीवर चाकूने तीन वार केले. त्याच्या छातीच्या उजव्या बाजूस वर्मी वार केला. हा चाकू त्याच्या छातीत आहे असा सोडून मारेकर्‍यांनी पलायन केले. रक्‍ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या शंभू याने प्रसंगावधान राखत तातडीने मंदार बर्गे याला मोबाईलवरुन घटनेची माहिती दिली. मंदार व त्याचे मित्र लगोलग हॉटेलवर पोहोचले. त्यांनी मोटारसायकलवरुन शंभू याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले, मात्र प्रकृत्ती चिंताग्रस्त असल्याने त्याला सातार्‍यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. रुग्णवाहिकेत त्याने रामदास रमेश बर्गे व अक्षय संजय बर्गे यांना माझ्यावर झालेली गेम जयवंत पवार याने करायला लावली, त्यांचा यात हात आहे, हे सर्व त्याने करायला लावले, असे सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. उपचार सुरु असताना रात्री 1 च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
    सातारच्या जिल्हा रुग्णालयात मृत शंभू बर्गे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर बर्गे कुटुंबीय व मित्रमंडळींनी मृतदेह असलेली शववाहिका थेट कोरेगाव पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर आणून लावली. जोपर्यंत खुन्यांना अटक करत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. उपविभागीय पोलीस अधिकारी कु. प्रेरणा कट्टे व पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे यांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, इतरांचा शोध सुरु आहे, असे समजावून सांगत मृतदेहाची हेळसांड होऊ देऊ नका, अशी विनंती केली. पोलिसांनी दिलेल्या आश्‍वासनानंतर शंभू बर्गे याचा मृतदेह वेताळगल्ली (टेक) येथील निवासस्थानी नेण्यात आला. तेथून सकाळी 11 वाजता केदारेश्‍वर मंदिराच्या पिछाडीस असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
    दरम्यान, मंदार बर्गे याने पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. शंभू बर्गे याचा खून हा जयवंत पवार याने करावयास लावलेला असून त्याच्यावर माझा संशय असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान, अतिरिक्‍त जिल्हा पोलिस प्रमुख विजय पवार यांनी प्रत्यक्षदर्शींची व संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या दोघांची कसून चौकशी केली. त्यांच्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व त्यांच्या पथकाने संशयितांची चौकशी केली व त्यांना ताब्यात घेत पुणे येथे तपासासाठी नेले आहे. पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे तपास करत आहेत.

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *