👁 9 Views

घराचे दार ढकलून शेजारी जाताच त्यांचे घरात झाली चोरी…! रोख रक्कम व सोन्याचे दागिण्यांसह 2 लाख 35 हजार चोरून चोरटे पसार… पंढरीतील शासकीय वसाहतीमधील घटना…

गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!


11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 25 August 2017  


    पंढरीतील शासकीय वसाहतीमधील एका घरातील गृहिणी आपल्या घराचे दार पुढे ओढून शेजारच्या घरी जाताच अज्ञात चोरटयांनी घरात शिरून घरातील तिजोरी साफ करून पलायन केल्याची घटना घडली आहे.
    याबाबत शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सौ.सुनिता बिराप्पा बरकडे, रा. प्लाॅट नं. 105, शासकीय वसाहत, पंढरपूर या काल दि.24 आॅगस्ट रोजी दु. 1:50 ते 2:30 वाजणेच्या दरम्यान आपले घराचे दार पुढे ओढून शेजारच्या घरी गेल्या होत्या. याच वेळी अज्ञात चोरटे त्यांच्या घरात शिरले व घरातील लाॅकर उचकटून त्यातील रोख 15 हजार रूपये,  85 हजार रुपयाचे सोन्याचे गंठण, 90 हजार रूपयांच्या सोन्याच्या बांगडया (पाटल्या), 30 हजार  रूपयेची सोन्याची चैन अशी एकुण 2 लाख 35 हजार रूपयेची चोरी करून चोरटे पसार झाले.
    घरी आल्यावर सौ.बरकडे यांना घरात चोरी झाल्याचे समजले व त्यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर भा.दं.वि. कलम 454, 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोसई गोसावी हे करत आहेत.
    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *