👁 6 Views

सोलापूर: ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये अडकुन १२ वर्षीय बालकाचा मृत्यू , मंगळवेढा तालुक्यातील घटना

 

सोलापूर : शेतात रोटरत असताना ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या बारा वर्षे बालकाचा रोटर मध्ये अडकून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यात कात्राळ येथे घडली आहे.


सुरेश शरणाप्पा खांडेकर (वय १२ रा.कात्राळ ता.मंगळवेढा) असे मयत झालेल्या बालकाचे नाव आहे.


याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गुरुवार दि.२३ मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सुरेश खांडेकर हा कात्राळ शिवारातील प्रमोद खडू पांढरे यांच्या शेतात लाल रंगाच्या विना नंबरचा ट्रॅक्टरवर बसला होता. ट्रॅक्टर चालक वाहन चालवत असताना अचानक ट्रॅक्टरमधून पडून पाठीमागील टायरखाली जाऊन रोटरमध्ये अडकला. या अपघातामध्ये गंभीर जखमी होऊन मयत झाला.


दरम्यान अपघातानंतर मंगळवेढा पोलिसांनी घटनास्थळी देऊन पाहणी केली. या प्रकरणी मयत मुलगा याचे वडील शरणाप्पा खांडेकर यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात अनोळखी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे. निष्काळजीपणे तसेच बे जबाबदारीने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अनोळखी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *