गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
मुख्य संपादक- भगवान वानखेडे
Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
mail-livepandharpur@gmail.com
web – http://www.pandharpurlive.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 29 August 2017
गणेशोत्सवानंतर उभे करणार मोठे जनआंदोलन-कृष्णा वाघमारे
पंढरपूर शहरातील वर्षानुवर्षे कांही प्रमुख मार्ग खराब झालेले आहेत. परंतु या मार्गांची दुरुस्ती झालेली नाही..! येथील भक्क्ती मार्गाची अवस्थाही अशीच.. या मार्गावरील खडड्यांमुळे झालेल्या अपघातात अनेकांचा बळी गेला आहे. परंतु या मार्गाची दुरुस्ती अद्यापही झालेली नाही. यामुळे आज दुपारी संतापलेल्या नागरिकांनी व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज कांही काळ भक्ती मार्ग रोड लहुजी वस्ताद चौकात बंद करुन टाकला होता. परंतु पोलिसांच्या मध्यस्तीमुळे आंदोलन थांबवले गेले.
याबाबत पंढरपूर लाईव्हशी बोलताना येथील सामाजिक युवा कार्यकर्ते कृष्णा वाघमारे म्हणाले की, ‘‘ आज पोलिसांच्या विनंतीवरुन आंदोलन थांबवले आहे. परंतु पंढरपूर मधील रस्त्याच्या कामात होत असलेली दिरंगाई तसेच उपनगर व शहर परिसरातील खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्तीबाबत चाललेली दिरंगाई याच्या निषेधार्थ गणेशउत्सव झाल्यानंतर पंढरपूर मधील सर्व सामाजिक संघटनांना सोबत घेऊन प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन उभे करणार आहोत. सर्व सामाजिक संघटना व पंढरीच्या नागरीकरांनी या आंदोलनात बहुसंख्येने सहभागी व्हावे तरच पंढरीतील रस्त्यांचा प्रश्न सुटेल! असे आवाहन त्यांनी केले आहे.


