👁 5 Views

पंढरपूर रोटरी क्लब कडून करकंब हायस्कूलला सॅनिटरी पॅड ज्वलन मशीन भेट


पंढरपूर: प्रतिनिधी

रोटरी क्लब पंढरपूर यांच्या वतीने शुक्रवार दिनांक २४ मार्च २०२३ रोजी महर्षी दयानंद सरस्वती यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब (ता.पंढरपूर) येथे आरोग्य विषयक मार्गदर्शन व सॅनिटरी पॅड ज्वलन मशीन रामभाऊ जोशी हायस्कूल यांना पंढरपूर रोटरी क्लब कडून भेट देण्यात आले.


   यावेळी रोटरी क्लब पंढरपूरचे अध्यक्ष डॉ. कैलाश कंराडे, रोटरी क्लब पंढरपूर चे  मिलिंद वंजारी, रोटरी क्लब करकंब चे अध्यक्ष- रघुनाथ जाधव यांच्या उपस्थितीत सदर मशीन भेट देण्यात आली. यावेळी संस्थेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा हार पुष्पगुच्छ व सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.


          सदर कार्यक्रमात रोटरी क्लब व आरोग्य विषयी व मशीन बद्दल संपूर्ण माहिती मिलिंद वंजारी यांनी उपस्थितांना दिली. रघुनाथ जाधव  यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.  व  बाबुराव जाधव यांनी संस्थेच्या वतीने रोटरी क्लब पंढरपूर चे आभार मानले.


        सदर कार्यक्रमास शैक्षणिक सल्लागार समितीचे  बाबुराव जाधव, लक्ष्मण वंजारी,  अमर चव्हाण,  संजय मोहिते, मारुती व्यवहारे, पत्रकार मनोज पवार व मुख्याध्यापक हेमंत कदम यांच्यासोबत सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थितीत होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *