👁 10 Views

शेतकऱ्यांनी दुध व्यवसायाकडे वळावे..!-मुरलीधर मुंडे

    • गणेशोत्सवानिमित्त व महालक्ष्मी सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
    • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
    • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
    • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
    • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 31 August 2017

    परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील तुळजाभवानी दुध संकलन केंद्र तळेगाव   येथील  दुध उत्पादक शेतकरयांना दुध व्यवसाय माहिती  पुस्तीकाचे वाटप कुस्तीगिर परिषदेचे तालुका अध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
      शेतकऱ्यांनी दुध व्यवसायाकडे वळावे. शेती व्‍यवसायाला संलग्‍न असा पशुपालन हा व्‍यवसाय फार पुरातन काळापासून केला जातो. समाजातील फार मोठा घटक या व्‍यवसायावर अवलंबून आहे. दुग्‍धव्‍यवसायातील नव-नवीन तंत्रज्ञानामुळे या पारंपरिक धंद्याला तेजीचे स्‍वरुप आले आहे.वाढत्‍या बेरोजगारीमुळे ग्रामीण भागातील तरुण शहराकडे धाव घेतात. ग्रामीण भागात विविध स्‍वयंरोजगाराच्‍या संधी निर्माण झाल्‍यास तेथील बेरोजगारी कमी होण्‍यास व आर्थिक परिस्‍थिती सुधारण्‍यास मदतच होणार आहे. शेतीला पूरक व्‍यवसाय म्‍हणून दुग्‍ध व्‍यवसायाची जोड दिल्‍यास शेतक-यांना वर्षभर खात्रीशीर व सातत्‍यपूर्ण उत्‍पन्‍न मिळेल. तसेच राज्‍याच्‍या दूध उत्‍पादनात वाढ होऊन ग्रामीण भागात स्‍वयंरोजगार देखील निर्माण होईल. शेतकऱ्यांची दुग्धव्यवसायातून प्रगती होईल. असे प्रतिपादन कुस्तीगिर परिषदेचे तालुका अध्यक्ष मुरलीधर मुंडे यांनी केले. यावेळी तळेगाव येथील ग्रामस्थ,गावकरी, शेतकरी, दुग्ध उत्पादक, व्यवसाय व इतर अनेक मंडळी उपस्थित होते.


        • पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
        • सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
        • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
        • मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111 

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *