👁 4 Views

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, तरूणाचा थेट ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत पुन्हा एकदा चूक झाल्याचं समोर आलं आहे. नरेंद्र मोदी आज (दि.25 मार्च) कर्नाटकच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न एका तरुणाने केल्यामुळे सुरक्षा रक्षकांची चांगलीच भंबेरी उडाली.


मात्र, पोलिसांनी या तरुणाला तात्काळ ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत गेल्या तीन महिन्यात दुसऱ्यांदा त्रुटी निर्माण झाल्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर प्रश्चचिन्ह निर्माण करण्यात येत आहेत.


कर्नाटकच्या दावणगिरी येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली होती. यावेळी त्यांची रॅली जात असताना त्यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच नरेंद्र मोदींच्या नावाने नागरिक मोठ्या घोषणा देत होते.


याचवेळी एका तरुणाने नरेंद्र मोदी यांच्या दिशेने धावत त्यांच्या गाडीजवळ जाण्याचा प्रयत्न केला. तो तरुण मोदींच्या गाडीजवळ पोहोचणार इतक्यात सुरक्षा रक्षकांनी आणि पोलिसांनी त्याला बाजूला करत ताब्यात घेतलं. दरम्यान, या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणेवर प्रश्चचिन्ह निर्माण करण्यात येत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *