- गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर,दि.31: गणेशोत्सव हा आनंदाचा सण आहे. गणपतीचे दर्शन घेण्यास व गणेश मिरवणूकीत सहभागी होण्यासाठी गणेशभक्त मोठ्या भ्क्ती भावाने व उत्साहाने येत असतात. यासाठी मंडळानी पर्यावरणपुरक गणशोत्सव साजरा करण्याबरोबरच डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी संवादपर्व या उपक्रमात बोलताना केले.
माहिती व जनंसपर्क महासंचालनालयाच्या सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने दर्शन मंडप चौक गणेशोत्सव तरुण मंडळ येथे संवादपर्व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक गजानन गजभारे, श्री. धोत्रे, माहिती सहायक एकनाथ पोवार,मंडळाचे अध्यक्ष प्रथमेश बारस्कार,मंडळाचे कार्यकर्ते चैतन्य ताटे, रामकृष्ण बीडकर, श्रीनाथ माने, विकास बडवे, माहिती कार्यालयाचे अविनाश गरगडे, इक्बाल भाईजान, भाऊसाहेब चारमले, नवनाथ कोळी यांच्यासह गणेशमंडळाचे कार्यकर्ते, गणेशभक्त व नागरीक उपस्थित होते.
श्री. दबडे म्हणाले, गणेश मंडळानी समाज उपयोगी उपक्रम घेण्यावर भर द्यावा. यामध्ये वृक्षलागवड, शाळेतील मुलांना वह्या-दप्तराचे वाटप, व्याख्याने, जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करुन गणेशभक्तांना पर्वणी द्यावी. तसेच सुरक्षेसाठी मंडळानी सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसण्यात पुढाकार घ्यावा. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्याचा वापर करण्यावर भर द्यावा. दर्शन मंडप चौक गणेशोत्सव तरुण मंडळाने विधायक उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी मंडळाचे कौतुकही केले. जिल्हा माहिती कार्यालयाचा संवादपर्व स्तुत्य उपक्रम असल्याचेही ते म्हणाले.
पोलीस उप निरीक्षक गजानज गजभारे म्हणाले, गणेश मंडळानी गणेशोत्सवाचे पावित्र्य राखून गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सवात अंधश्रध्दा निमूर्लन, अन्नदान, व्याख्याने यासारखे विधायक उपक्रम राबवावेत. गणेशोत्सव कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता मंडळानी घ्यावी गणेश विसर्जन मिरवणुकीत कायद्याचे पालन करुन पोलीस प्रशासास सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

