👁 10 Views

सार्वजनिक ग्रंथालय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथमित्र पुरस्कारांसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 12  september  2017 
मुंबईदि. 12 : ग्रंथालय संचालनालयामार्फत सन 2017-18 या वर्षाकरिता देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय’ आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या कार्यालयाकडे दोन प्रतीमध्ये 20 सप्टेंबर पर्यंत सादर करावेतअसे आवाहन ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार, ग्रंथालय चळवळीस योगदान देणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ता आणि सेवक यांनी अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रवृत्त व्हावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी  डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्रपुरस्कार देण्यात येतो.
राज्यतील शहरी व ग्रामीण विभागातील ’, ‘’,  ‘’ आणि’ वर्गातील सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये 50 हजाररुपये 30 हजाररुपये 20 हजार आणि रुपये 10 हजार रोख पारितोषिक,सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह राज्यस्तरीय प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी 25 हजार रुपये रोख पारितोषिकसन्मानचिन्ह व मानचिन्ह तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभाग स्तरावर प्रत्येकी एक कार्यकर्ता व सेवक यांना रुपये 15 हजार रोख पारितोषिक,सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *