- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 13 september 2017
*परळीत इष्टलिंग महापूजा व धर्मजागृती, धर्मोपदेश कार्यक्रमाची भक्तीपूर्ण वातावरणात सांगता*
*परळी/प्रतिनिधी*
ईश्वर पूजा ही केवळ धार्मिक क्रिया नसून ते एक ज्ञान सत्र आहे, त्यातून मोठा आनंद तर मिळतोच सोबतच मन प्रसन्न होते आणि आपले मन पवित्र सुद्धा होते. खऱ्या अर्थाने इष्टलिंग महापूजा व अन्य प्रकारचे धार्मिक कार्यक्रम हा एक आनंद सागर असून त्यातून सर्वांनी सहभागी होत आपल्या मनाची शुद्धी घडून आणावी असे आवाहन केदारपीठाचे जगदगुरू श्री श्री श्री 1008 भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांनी व्यक्त केले. दरम्यान केदारनाथ आणि वैद्यनाथ हे दोन्ही द्वादश ज्योतिर्लिंगापैकी असून आज इष्टलिंग महापूजेच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग क्षेत्र केदारनाथ आणि वैद्यनाथ यांचे नाते अधिक अतुट झाले आहे असेही केदारपीठाचे जगदगुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांनी सांगितले.
परळी येथे सलग सहा दिवस चाललेल्या संगीतमय इष्टलिंग पूजा व धर्मजागृती,धर्मोपदेश कार्यक्रमाची सांगता आज श्री क्षेत्र परळी वैजनाथ येथे अत्यंत भक्तीपूर्ण व तेवढ्याच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. देवस्थानच्या दर्शन मंडपात हजारो भाविकांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा आज समारोप झाला. यावेळी बोलतांना केदारपीठाचे जगदगुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांनी सर्वप्रथम परळी शहरातील भाविक भक्तांचा या कार्यक्रमात असलेल्या सक्रीय सहभागाचा आवर्जुन उल्लेख करीत त्यांचे आभार व्यक्त केले. ते पुढे बोलतांना म्हणाले की, परळी वैजनाथ हे महातीर्थ क्षेत्र असून भगवान शिव यांना प्रिय असणारे बिल्व पत्र, फुले केवळ इथेच मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळेच संगीतमय इष्टलिंग पूजा भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाल्याचे ते म्हणाले.
आपल्या समारोपाच्या भाषणात पुढे बोलतांना जगदगुरू म्हणाले की, भारताचे संविधान, कायदे व नियम तसेच न्याय हे इश्वरा इतकेच पवित्र असून त्याचे पालन सर्वांनी करायला हवे, संविधान आणि कायद्याच्या पालनातून सर्व वैभव प्राप्त होईल असा संदेश त्यांनी दिला. दरम्यान परळी येथे अत्यंत उत्साहात इष्टलिंग पूजा पार पडली असून समाज बांधवांसह वैद्यनाथ देवस्थानच्या सर्व संचालकांच्या अथक परिश्रमाला मनापासून सर्वांनी दाद दिली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. उत्तराखंडातील श्री केदारनाथ मंदिर ज्योतिर्लिंग क्षेत्र असून आज परळी येथील ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या वैद्यनाथ प्रभूंच्या भूमित संगीतमय इष्टलिंग पूजा करता आली हे आमचे भाग्य असल्याचे जगदगुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले. या इष्टलिंग पूजेच्या माध्यमातून केदारनाथ आणि वैद्यनाथ यांचे अतुट नाते निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान आज समारोपाच्या प्रसंगी परळीसह बीड जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी इष्टलिंग महापूजेस भेट देवून जगदगुरूंचे मनोभावे आशिर्वाद घेतले. यावेळी परळी येथील जेष्ठ छायाचित्रकार उमाकांतअप्पा चौधरी यांनी जगदगुरूंना ते वयाचे 16 वर्षांचे असतांनाचे दुर्मिळ छायाचित्र भेट दिले. परळी शहर आणि परिसरातील विविध राजिकय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी समारोप कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित होते.
*नंदिकेश्वर महाराजांचे उत्कृष्ठ संयोजन*
ज्योतिर्लिंग क्षेत्र परळी वैजनाथ येथे पार पडलेला संगीतमय इष्टलिंग सोहळा सर्वांर्थाने चांगला झाला. या संपूर्ण सोहळयाचे उत्कृष्ठ संयोजन हे एक प्रमूख वैशिष्टये असून याचे सर्व श्रेय सोनपेठ येथील शिवाचार्य नंदिकेश्वर महाराज यांच्यासह वीरशैव समाज परळी, वैद्यनाथ देवस्थान व या सोहळयासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व ज्ञात, अज्ञात व्यक्तींना आहे. त्यातही सोनपेठ येथील नंदिकेश्वर महाराज यंानी संगीतमय इष्टलिंग पूजेच्या आठवडाभर आधीपासून या कार्यक्रमाची तयारी सुरू केली होती. हा सोहळा संस्मरणीय व्हावा या दृष्टीकोनातून नंदिकेश्वर महाराज यांनी शेवटपर्यंतचे नियोजन केले होते.
*शिवाचार्यांची मांदियाळी*
परळी येथे आज झालेल्या इष्टलिंग महापूजा समारोप प्रसंगी परिसरातील विविध मठांच्या मठाधिपतींची म्हणजेच शिवाचार्यांची महत्वपूर्ण उपस्थिती हे या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्टये म्हणता येईल. जगदगुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या उपस्थितीत होत असलेल्या इष्टलिंग महापूजेच्या समारोपासाठी माजलगाव येथील ष.ब्र.108 प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज, शिखर शिंगणापूरचे ष.ब्र.108 सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, बर्दापुर येथील ष.ब्र.108 चन्नबसवेश्वर शिवाचार्य महाराज यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे



