👁 8 Views

राजकारणात असुनही लक्ष्मणराव धनवडे यांनी कधी कुणाशी राजकारण केले नाही- हरिष गायकवाड

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 13  september  2017 

   * लक्ष्मण धनवडे यांचा वाढदिेवसानिमित्त भव्य सत्कार *

कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.ऊपसभापती व नारायण चिंचोलीचे मा.सरपंच लक्ष्मण धनवडे यांचा वाढदिवसानिमित्त राजे ग्रुप,लक्ष्मणराव धनवडे मित्र मंडळ व पोलीस मित्र संघटनेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक हरिष गायकवाड हे होते तर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवक नेते प्रणव परिचारक,मा.नगरसेववक अशोक डोंबे,मा.नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट,शिवसेना उपजिल्हा प्रमुख महावीर देशमुख,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी गुंड,मेजर हनुमंत देशमुख,ऍड.परिचारक,ऍड.जाधव,विनय गुटाळ आदी उपस्थित होते.
    यावेळी बोलताना युवक नेते प्रणव परिचारक यांनी लक्ष्मणराव धनवडे हे सर्वसामान्य लोकांशी रोजचा थेट संपर्क असलेले नेतृत्व असून ग्रामपंचायत असो अथवा बाजार समिती त्यांचा कामाचा आवाका खुप मोठाआहे.सतत हसतमुख व्यक्तीमत्व म्हणून ते सर्वांना परिचीत असून हेच त्यांच्या लोकप्रियतेचे गमक आहे.
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना संचालक हरिष गायकवाड यांनी लक्ष्मणराव धनवडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत विविध उपक्रमांचे कौतुक करुन आपल्या गावाचा परिसराचा विकास करण्यासाठी,लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी झपाटून काम करणार्‍या तात्यांना आम्ही रोज पहात असतो.सार्वजनिक जिवनता काम करीत असताना त्यांनी जी विनम्रता जोपासली आहे त्यामुळे त्यांची लोकप्रियता फार मोठी आहे.राजकारणात असूनही ते कधीही राजकारण करीत नाहीत हे आम्ही जवळून पाहीले आहे,मा.आ.सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रती असलेली त्यांची अपार श्रध्दा आणि आ.प्रशांतराव परिचारक यांच्यावर असलेली निरपेक्ष निष्ठा यामुळे तात्यांचे कुठलेही काम कधी अडले नाही असे गौरवोद्गार यावेळी गायकवाड यांनी काढले.
    वाढदिवसाच्या निमित्त नारायण चिंचोली व भैरवनाथ वाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.तर ग्रामस्थांच्या वतीने ग्रामदैवत सुर्यनारायण देवाची महापुजा करण्यात आली.
     या कार्यक्रमास नारायण चिंचोलीचे सरपंच विठ्ठल माने,चेअरमन धर्मराज नलवडे,उपसरपंच बळवंत धनवडे,व्हा.चेअरमन विष्णू माने,मा.सरपंच नितिन मस्के,विजय कोळेकर,अभिजीत कवडे,श्रीधर कोळेकर,शिवाजी माळी,भास्कर गुंड,पोपट पाटील,ज्ञानेश्‍वर बरडे,विजय पाटील,गोवर्धन वाघमोडे,हरिभाउ माने,आण्णा हजारे,दिलीप गाजरे,महादेव सरडे,गुलाब कोळेकर,डॅा.गाजरे,हरिभाऊ खरात,बाळासाहेब सुतार,आप्पासाहेब वाघमोडे,दादा डुबल,भाऊसाहेब माने,धनाजी हजारे,प्रकाश शिंगटे,विजय शिंदे,महावीर जाधव,भानुदास गाजरे,महादेगव डुबल,धर्मराज हजारे,खंडू डांगे,भैरु शेटे,नितिन सुतार,गणेश लामकाने,दिपक खरात यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.  

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *