👁 12 Views

तहसिलदार विद्याचरण कडवकर यांना धक्का बुक्कीच्या निषेधार्थ परळीत महसूल व तलाठी संघटनेच्या वतीने निदर्शने….!

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 14  september  2017 
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- परभणी येथील तहसीलचे तहसिलदार विद्याचरण कडवकर यांना धक्का बुक्कीच्या निषेधार्थ परळी तहसील कार्यालयात महसूल व तलाठी संघटनेचे काम बंद आंदोलन करण्यात आले.
या बाबत सविस्तर माहिती अशी की शुक्रवार दिनांक ०८ .०९.१७ रोजी परभणी येथे सभेच्या ठिकाणी शासकीय कर्तव्य बजावत असताना परभणी चे तहसीलदार विद्याचरण कडवकर हे सभेच्या ठिकाणी जात असताना तेथे असलेले विश्व पानसरे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यानी तहसीलदार यांना धक्का बूक्की करून अपमानास्पद वागणूक दिली आहे. तसेच गंगाखेड येथे रात्री ११३० वाजता येथील दत्त मंदिराजवळ तलाठी शिवाजी मुरकुटे हे अवैद्य वाळू वाहतूक करणार्‍या वाहनावर कार्यवाही करण्यासाठी थांबले असता पोलीस निरीक्षक श्री सोपान सिरसाट यांनी तलाठी यांना मारहाण केली तरी या दोन्ही प्रकरणातील पोलिस अधिकारी यांना तत्काळ निलंबित कारावे या मागणीसाठी तहसील तहसिल कार्यालय परळी वैजनाथ येथे काम बंद आंदोलन करण्यात आले. वरील दोन्ही घटना बेकायदेशीर आहेत. सदर घटनेचा सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने जाहीर तीव्र निषेध करण्यात येत आहे. वरिल घटनांमध्ये अतिरीक्त पोलिस अधीक्षक श्री विश्व पानसरे व पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे व या दोन्ही अधिकारी यांच्यावर कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र राज्य तहसिलदार,नायब तहसिलदार संघटना, तलाठी व पटवारी संघटना व तसेच महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य मधवर्ती कर्मीचारी संघटना यांचे वतीने तीव्र आंदोलन करण्यात येइल इशारा देण्यांत आला आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *