- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 14 september 2017
पंढरपूर (प्रतिनिधी):- “कोणतेही ज्ञान घेत असताना ते मातृभाषेतून घेतल्यास ज्ञान प्राप्ती सहज आणि सुलभ होते. म्हणजेच मातृभाषेतून वैश्विक ज्ञान प्राप्ती सहज सुलभ होते.”असे मत येथील विश्वविक्रमी कवी रवी वसंत सोनार यांनी व्यक्त केले.ते येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हिंदी भाषा दिनाच्या औचित्याने प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की “मराठी आणि हिंदी या भाषा देवनागरी लिपीत असल्यामुळे प्रत्येक अक्षर हे वैशिष्टय़पूर्ण आहे. म्हणूनच प्रत्येकालाच आपल्या मातृभाषेविषयी तसेच राष्ट्रभाषेविषयी आदर व अभिमान असणे आवश्यक आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्राचार्या सौ. सुप्रिया बहिरट या होत्या. या कार्यक्रमाच्या औचित्याने शाळेतील सुमारे चाळीस मुलांच्या हिंदीतील कथाकथनाची स्पर्धा पार पडली. कवी रवी सोनार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. व सहभागी विद्यार्थ्यांना कथाकथनाविषयी मार्गदर्शन केले आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या सुश्राव्य अशा कविता सादर केल्या. तसेच हिन्दी भाषाविषयक घोषवाक्यांचा गजर केला.
सदर हिंदी दिवस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सौ. संजीवनी फडतरे यांनी केले तर सौ. तनुजा टोणपे यांनी आभार व्यक्त केले
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे

