- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
नवी दिल्ली/श्रीनगर– श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा यंत्रणांनी लष्करचा कमांडर अबू इस्माइलचा खात्मा केला आहे. श्रीनगर शेजारील नौगाम येथे दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक उडाली. यात अबूसह आणखी एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले. यंत्रणा बऱ्याच दिवसांपासून अबूच्या मागावर होती. अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्याचा तो मास्टरमाइंड होता. त्याचा शोध घेण्यासाठी स्पेशल ऑपरेशन सुरु करण्यात आले होते. अबू इस्माइल हा पाकिस्तानचा रहिवासी होता, तीन वर्षांपासून तो काश्मीरमध्ये सक्रीय होता.
किती लोक मारले गेले होते?
अनंतनाग येथे 10 जुलै रोजी अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर बेछूट गोळीबार करण्यात आला होता. यात 5 महिला यात्रेकरुंसह 8 जणांचा मृत्यू झाला होता. 15 जण जखमी झाले होते. हे सर्वजण अमरनाथ यात्रेवरुन जम्मूला परत येत होते.

कसे कळाले अबू इस्माइल होता मास्टरमाइंड
– तपास यंत्रणांनी अबू इस्माइलचा शोध घेण्यासाठी दक्षिण काश्मीरमध्ये लक्ष्य केंद्रीत केले होते. त्यांच्या माहितीनुसार अबू एक वर्षापासून या भागात सक्रीय होता. तो अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. सुरक्षा यंत्रणांनी टेक्निकल सपोर्ट आणि इंटेलिजिन्स रिपोर्टच्या आधारावर त्याचा शोध सुरु केला होता. टेक्निकल इंटरसेप्शन्सनेच हे स्पष्ट झाले होते की अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर झालेल्या हल्ल्याचा तो मास्टरमाइंड होता.

कोणी लीड केले होते ऑपरेशन
– काश्मीरचे आयजी मुनीर खान यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले होते की पाकिस्तान निवासी अबू इस्माइलने 4 दहशतवाद्यांसह हल्ला केला होता. अबूनेच या हल्ल्याचे नेतृत्व केले होते. त्यांनी 9 जुलैरोजीही हल्ल्याचा प्रयत्न केला होता. मात्र चोख बंदोबस्त असल्यामुळे त्यांना काहीही करता आले नव्हते.

– जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील संबूरा भागात 7 ऑगस्टला लष्कर-ए-तोएबाचा उमर नावाचा दहशतवादी सुरक्षा रक्षकांनी ठार केला होता. तो अबूच्या ग्रुपचा सदस्य असल्याची माहिती होती. हा देखील अनंतनाग हल्ल्यात सहभागी होता.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे