👁 8 Views

पंढरपूर- मुंडेवाडीच्या बंधाऱ्यावरुन वाहून गेलेल्या सुरेश बनकर यांचा मृतदेह सापडला ..

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 15  september  2017 


पंढरपूर- मुंडेवाडीच्या बंधाऱ्यावरुन वाहून गेलेल्या सुरेश बनकर यांचा मृतदेह सापडला ..
काल रात्री पंढरपूर तालुक्यातील मुंडेवाडी येथील बंधाऱ्यावरुन दुचाकीवरून प्रवास करणारे सांगोला तालुक्यातील दांपत्य वाहून गेले. यांचा शोध सुरू होता दरम्यान आज सायंकाळी सुरेश बनकर यांचा मृतदेह नळी येथील नदीपात्रात सापडला असल्याची माहिती मिळतेय. त्यांच्या पत्नीचा शोध लागला नसून शोधकार्य सुरू असल्याची माहिती मिळतेय.
    – पंढरपूर तालुक्यातील मुंडेवाडी येथिल बंधाऱ्यावरुन पाणी वाहत असतानाही सांगोला तालुक्यातील  पती पत्नी दुचाकीवरून जात असताना भीमा नदीत वाहून गेल्याची दुर्घटना काल गुरुवार दि. 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ च्या दरम्यान घडली.

    सांगोला पुजारवाडी येथील सुरेश विष्णु बनकर (वय 45)  आणि त्यांच्या पत्नी सौ. वंदना सुरेश बनकर (वय 32) हे दुचाकीवरून पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथे वंदना यांच्या आजारी मावशीला भेटण्यासाठी गेले होते . संध्याकाळी ७ च्या सुमारास ते अनवली गावाला जाण्यासाठी निघाले . परंतु बंधाऱ्यावरुन जात असताना पाण्याच्या वेगाचा अंदाज न आल्याने त्यांनी दुचाकीवरून या बंधाऱ्यावरुन जाताना हा अपघात घडला.


    अनवली हे सौ. वंदना यांचे माहेर होते . रात्रीचा मुक्काम माहेरी करुन हे दांपत्य सकाळी सांगोल्याला आज आपल्या घरी जाण्यासाठी निघाले होते. भीमा नदीत उजनी धरणातुन ४० हजार क्यूसेकचा विसर्ग भीमेत सोडल्याने नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत. मुढेवाडी बंधाऱ्यावर देखील पाणी आल्याने दुचाकीवरुन जाणारे बनकर दांपत्य वाहून गेले असुन स्थानिकांनी  दुर्घटना घडली तेंव्हाच  मदतकार्य सुरु केले होते पण अंधार असल्याने अडचणी निर्माण झाल्या.  पंढरपूर तालुका पोलिसांकडून आज दुपारी 1 वा. माहिती मिळाली की,  या दांपत्याचे शोधकार्य सुरूच होते. आज सायंकाळी सुरेश बनकर यांचा मृतदेह नळी येथील नदी पात्रात सापडला असून त्यांच्या पत्नीचा शोध सुरु आहे. 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *