- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
मुंबई,:
स्वच्छ भारत अभियानांतर्गत बृहन्मुंबई महानगरआणि महाराष्ट्र शासन यांच्या विद्यमाने मुंबईतील महात्मा फुले मार्केटयेथे ‘स्वच्छता हीच सेवा’ या मोहिमेचा औपचारिक शुभारंभ मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आला.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्यातीन वर्षात स्वच्छ भारताचा संदेश दिला आणि सर्व देश त्यांच्या पाठीशीउभा राहिला. स्वच्छतेसाठी शौचालयाची संख्या वाढवून एक प्रकारचे मोठेअभियान सुरू झाले. यातून घनकचरा व्यवस्थापनाची सुरूवात झाली.नगर विकास विभागाने घनकचऱ्याचे व्यवस्थापन उत्तम केले, असल्याचे सांगुन मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेसाठी पंधरवडा जाहीर केला, त्याचा आजपासून औपचारिकप्रारंभ झाला आहे. ही मोहीम 2 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे राष्ट्रपितामहात्मा गांधी यांच्या जयंतीदिनापर्यंत चालणार आहे. या स्वच्छताअभियानाच्या निमित्ताने प्रत्येकाने कचरा न करायचा असे ठरवू आणिआपले शहर स्वच्छ करूया, असा संकल्प मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री सुभाष देसाई यांनी स्वच्छतेच्या बाबतीत देशातआपले मुंबई शहर क्रमांक एकचे व्हावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
याप्रसंगी मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिवसुमीत मल्लिक, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषाम्हैसकर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, आमदार राजपुरोहित, स्थानिक नगरसेवक, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी–कर्मचारी, मार्केटचे पदाधिकारी, स्थानिक रहिवासी तसेच विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे


