👁 12 Views

महाराष्ट्र मिशन 1 -मिलीयन” फुटबॉल खेळ महोत्सवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 16  september  2017 

आज महाराष्ट्र फुटबॉलमय होणार – देवेंद्र फडणवीस
मुंबई
“महाराष्ट्र मिशन 1 -मिलीयन” या फुटबॉल खेळ महोत्सवाचा शुभारंभ झाला असून आज दिवसभरात राज्यभरात 10 लाखांहून अधिक विदयार्थी फुटबॉल खेळणार असल्याने आज महाराष्ट्र फुटबॉलमय होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आज सकाळी मुंबई जिमखाना येथे महाराष्ट्र मिशन 1मिलीयन  या फुटबॉल खेळ महोत्सवाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिशन वन मिलिअनचा झेंडा फडकवून केले. यावेळी क्रीडा मंत्री विनोद तावडे,आमदार राज पुरोहित, मुंबई जिल्हाधिकारी संपदा मेहता उपस्थित होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांनी सृदृढ शरीर हवे तर फुटबॉल खेळा असे सांगितले होते आणि फुटबॉल खेळल्याने आपण फिट राहतो. त्यामुळे फिट राहण्यासाठी फुटबॉल हा उत्तम पर्याय आहे.
ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनिमित्ताने महाराष्ट्रात आज जवळपास 10 लाखांहून अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहे. अशा प्रकारचा अभिनव कार्यक्रम योजणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे. फिफाचे काही सामने महाराष्ट्रात होणार असून ही आपल्यासाठी आनंदाची बाब असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.
मुलांनी ई-गॅझेट पासून दूर राहावे आणि मैदानावर येवून फुटबॉल खेळाचा आनंद लुटावा हा या उपक्रमामागे प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी मुलांनी अधिक वेळ मैदानावर द्यावा यासाठीच फुटबॉल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले.
मुंबई जिमखाना येथे आठ वेगवेगळे सामने आयोजित करण्यात आले आहेत. मुलींचा संघ, मुलांचा संघमुंबईचे डबेवालेक्रीडा पत्रकार विरुध्द राजकीय पत्रकारनॅशनल ब्लाईंड असोसिएशनचे विद्यार्थी,पालघर येथील आदिवासी संघ असे फुटबॉलचे सामने होत आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई जिमखाना येथे उपस्थित सर्व संघाना भेटून शुभेच्छा दिल्या.
याबरोबरच मुंबई शहरात सुमारे जवळपास तीन लाखांहून अधिक मुले-मुली 21 ठिकाणी फुटबॉल खेळणार आहेत.ओव्हल मैदान, क्रॉस मैदान, मुंबई जिमखाना, आझाद मैदान, पोलीस जिमखानामरिन ड्राईव्ह, पारशी जिमखानामरिन ड्राईव्ह, इस्लाम जिमखानामरिन ड्राईव्ह, विल्सन जिमखानामरिन ड्राईव्ह, शिवाजी पार्कदादर, कुपरेज मैदान, गोवन्स स्पोर्टींग क्लब, कर्नाटक स्पोर्टींग क्लब, मुंबई स्कूल स्पोर्टस असोसिएशन, शारीरिक शिक्षण महाविद्यालयवडाळा, नायगांव पोलीस मैदाननायगांव,  मुंबई विद्यापीठमरिन लाईन्स, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळएलफिन्स्टन, जिल्हा क्रीडा संकुलधारावी, प्रियदर्शनी पार्कमलबार हिल,  वरळी स्पोर्टस क्लबवरळी आणि एम.डी.एफ.ए.सेंट झेविअर्स मैदानपरेल पूर्व येथे फुटबॉल सामने खेळले जाणार आहेत.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *