- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 16 september 2017
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील रोपळे जि.प.शाळेमध्ये कार्यरत असणा-या आणि चळे येथील रहीवाशी असणाºया शिक्षीका सौ.विजया तुकाराम कोळी यांना रोटरी क्लब सोलापूरच्यावतीने देण्यात येणारा मानाचा राष्ट्र शिल्पकार पुरस्कार सोलापूर येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार जिल्हा शिक्षणाधिकारी संजय राठोड यांच्या हस्ते व सोलापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष जयेश पटेल, प्राचार्य ह.ना.जगताप, दिलीप सहस्रबुध्दे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देण्यात आला.
शिक्षीका विजया कोळी यांनी आपल्या शैक्षणिक कार्यकालामध्ये केलेल्या उपक्रमशील व सामाजिक कार्याची पोहच पावती असून विद्यार्थी घडवित असताना त्यांनी विविध स्पर्धा व उपक्रम राबवुन प्रेरणादायी कार्य केले असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले. तर हा पुरस्कार आपल्यासाठी प्रेरणास्थान असून आणखी गतीने आणि चांगल्या स्वरूपाचे उपक्रमशील कार्य करण्यासाठी आपल्यासाठी प्रेरणा देणार असल्याचे शिक्षीका विजया कोळी यांनी सांगितले.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विजया कोळी यांचे जि.प.सदस्य सुभाषराव माने, माजी सभापती अॅड.वामनराव माने, संचालक दिनकर कदम, गटशिक्षणाधिकारी पी.टी.घुगे, गटशिक्षणाधिकारी सुलभा वटारे, माजी संचालक विलास भोसले, माजी पं.स.सदस्य महेश कदम, संचलाक परमेश्वर गणगे, उपसरपंच गणेश भोसले, नागनाथ माळी, नारायण गायकवाड, हनुमंत कदम, रोपळे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जून भोसले व सदस्य, माजी कृषी अधिकारी मधुकर गुंजाळ, विस्तार अधिाकारी पोपट लवटे, केंद्रप्रमुख ना.ता.भोसले, व्यवस्थापन समिती अध्यक्षा सारीका भोसले, मुख्याध्यापक सुनिल शिंदे, तुकाराम कोळी यांच्यासह केंद्रातील शिक्षक, रोपळे, चळे व रांझणी येथील शिक्षणप्रेमी नागरीकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे


