👁 9 Views

महाराष्ट्राचे केंद्राकडे १५ हजार ५५८ कोटी… ‘तुम्ही व्यापारी असाल तुमच्या घरचे, राज्यांचे पाकीट का मारता? सेनेचा मोदी सरकारला खडा सवाल!

Pandharpur Live : ‘तुम्ही व्यापारी असाल तुमच्या घरचे, राज्यांचे पाकीट का मारता? असा खडा सवाल सेनेने मोदी सरकारला केला आहे. केंद्र सरकार विरोधात राज्यातील निर्वाचित राज्यसरकारने हल्लाबोल केला आहे. जीएसटी परताव्यावरून राज्याची मुस्कटदाबी, आर्थिक नाड्या आवळण्याचा प्रकार सुरू असेल तर केंद्रातील ठकसेनांविरुद्ध राज्यांना आवाज उठवावा लागेल. असा इशारा शिवसेनेनं दिलाय.

जीएसटीमुळं राज्यांच्या महसुली उत्पन्नात होणारा घाटा केंद्र सरकार भरून देईल, असा शब्द राज्य सरकारांना देण्यात आला होता. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून ही रक्कम मिळालेली नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना याबाबत पत्र लिहिलं होते.
राज्यांना त्यांच्या विकासाच्या, जनतेच्या जीवनावश्यक योजना राबवण्यासाठी पैसा हवा. तो हक्काचा पैसा द्यायला केंद्र तयार नसेल तर ‘राज्य विरुद्ध केंद्र’ असा नवा संघर्ष उभा राहील. केंद्रानं राज्याचा हक्क मारू नये, असा इशाराही देण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या मनमानी व्यवस्थेमुळं देशात आर्थिक अराजक निर्माण झालं आहे व त्याचा फटका राज्यांना बसला आहे.जीएसटी ही एक क्रांतिकारी योजना असल्याचा डांगोरा मोदींनी तेव्हा पिटला होता आणि आता परतावा देण्यास असमर्थता व्यक्त केली जात आहे. खरंतर तो एक भंपकपणाच होता हे आता दिसत आहे. महाराष्ट्राचे केंद्राकडे १५ हजार ५५८ कोटी घेणे असून, ते दिले नसल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. राज्यांच्या पैशावर केंद्राला मजा मारता येणार नाही. केंद्राला जीएसटीचा परतावा द्यावाच लागेल असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
_________________________________________________

पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क 

पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

      उपसंपादक-विजयकुमार माणिकराव गायकवाड   

मोबा.  8308838111, 8149624977, 7083980165

…………………………………….
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश…फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा… 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________
_________________________________________________

——————————————————-

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल ” पंढरपूर  Live ” 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whats Up –  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *