Pandharpur Live :
पंढरपूर- कानडा राजा पंढरीचा, ओंकार स्वरूपा आदी विविध अभंग देशातील विविध नामवंत गायकांच्या मुखातून ऐकून आपण मंत्रमुग्ध झालो आहोत. परंतु हेच अभंग, गवळणी, जोगवा रशियन गायकांच्या मुखातून ऐकण्याची मोठी संधी पंढरपूरकरांना मिळणार आहे. सहज ध्यान केंद्राच्या वतीने शनिवार २८ रोजी या अनोख्या संगीत मैफीलीचे मोफत आयोजन करण्यात आले आहे.
अध्यात्मिक क्षेत्रात एक वेगळे स्थान निर्माण केलेल्या श्रीमाताजी निर्मलादेवी यांनी सहज योग ही ध्यानाची पध्दत देश विदेशात प्रसिध्द केली आहे. भारतीय संस्कृती प्राचीन असून यामधील ध्यान हा प्रकार परदेशातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करीत आला आहे. नियमित ध्यान केल्यास याचे मोठे चमत्कारीक व जीवन समृध्द करणारे अनुभव पाश्चात्य साधकांना आले आहेत. यातूनच त्यांनी भारतीय संस्कृतीला जवळ केले आहे. माता निर्मलादेवी यांचे भारतात तसेच परदेशात मोठे भक्त असून या भक्तांच्या वतीनेच शनिवारी नाथ चौक येथील कवठेकर प्रशालेत सायंकाळी साडेपाच ते साडेआठ या वेळेत सदर कार्यक्रम आयोजित केला आहे.
सदर कार्यक्रमात अभंग, गवळणी, जोगवा, संस्कृत मंत्र यांचे सादरीकरण केले जाणार असून यासाठी एलीझ्वेटा वुल्फ, ओल्गा, शेरबिनिआ, ऍन्ड्रे निकातीन व स्वेतलाना वुल्फ हे पाच रशियन साधक येणार आहेत. यासह पुणे येथील वादकांचे पथक देखील त्यांना साथ देणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमासह ध्यान करणे, यातून येणारा आत्मसाक्षात्कार आदीं विषयी देखील उपस्थितांना माहिती देण्यात येणार आहे. यामुळे संगीत व ध्यान असा अनोखा संगम पहावयास मिळेल.
भारतीय लोकांवर विशेषतः तरूणांवर पाश्चिमात्य संस्कृतीचा मोठा प्रभाव आहे. परंतु जगाची कितीही प्रगती झाली तरी भारतीय तत्वज्ञान, योग व समतेचा संदेश याला दुुसरा पर्याय नाही. यामुळेच माता निर्मलादेवी यांच्या सहज ध्यान योगाची चीन, अमेरीका, रशिया, इंग्लड, अफ्रिका, ऑस्ट्रेलिया देशातील हजारो साधकांनी दिक्षा घेतली आहे. याव्दारे आलेल्या अनुभव येथे सादर केले जाणार आहेत. तरी या संगीत व ध्यान कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165
_________________________________________________
_________________________________________________