👁 5 Views

खळबळजनक… प्रेमप्रकरणातून घडली सोलापूरमधील ‘त्या’ राष्ट्रीय फुटबॉलपटूची हत्या

Pandharpur Live : 
सोलापूरमध्ये राष्ट्रीय फुटबॉलपटू असलेल्या ‘त्या’ तरूणाची प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. प्रदीप विजय अलाट या युवकाची हत्या काल करण्यात आली होती. ही हत्या प्रेमप्रकरणातून करण्यात आल्याचं सांगण्यात येतं आहे. सोलापूर महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नागेश गायकवाड यांचा पुत्र चेतन गायकवाड यांच्यासह पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम प्रकरणातून प्रदीपला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये गंभीर जखमी झाल्यामुळे प्रदीपचा जागीच मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केली आहे. मृत प्रदीप हा एक उत्कृष्ट फुटबॉलपटू होता. सोबतच विविध शाळांमध्ये क्रीडा प्रक्षिशक म्हणून ही कार्य करत होता. गावातल्या अशा तरुण मुलाची अशा प्रकारे हत्या झाल्यामुळे नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

सोलापूर विद्यापीठात सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धेसाठी स्वयंसेवक म्हणून जाण्यासाठी तो घरातून बाहेर पडला होता. मात्र, संध्याकाळच्या सुमारास सोलापुरातल्या मोदी परिसरातील गंगामाई रुग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत अज्ञात व्यक्तींनी त्याला दाखल करत पळ काढला. उपचारापुर्वीच प्रदीपचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान, आरोपी चेतन गायकवाडसह त्याचे मित्र फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश गायकवाड यांच्या पुतनीसोबत प्रदीपला फिरताना पाहण्यात आलं होतं असं फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्याच्या रागातच चेतन गायकवाड याच्यासह पाच ते सहा जणांनी प्रदीपची हत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे. या सगळ्या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत असून गायकवाड कुटुंबाची यात चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *