👁 7 Views

मंगळवेढा: 15 वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

 

मंगळवेढयाच्या ग्रामीण भागातून एका 15 वर्षीय मुलीस अज्ञात कारणासाठी अज्ञात व्यक्तीने फूस लावूनपळवून नेण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.


याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, यातील पिडीत मुलीचे वडील हे दि.27 रोजी गावात दुध घालण्यासाठी गेले होते.

रात्री 8.00 वा. पिडीत मुलीच्या आईने पतीस फोन करून सांगितले की,स्वयंपाक करीत असताना 15 वर्षीय मुलगी शौचास जाते असे सांगून गेली बराच वेळ होवूनही ती घरी परत आली नाही.


त्या मुलीचा सर्वत्र तीच्या मैत्रीण व नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र ती मिळून आली नसल्याने कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांत मुलीच्या वडीलांनी तक्रार दाखल केली आहे.

तीचे वर्णन पुढील प्रमाणे -रंग सावळा,उंची 5 फुट,चेहरा उभट,अंगात नेसणेस चॉकलेटी टॉप व निळया रंगाची लेगीज पँट अशा वर्णनाची मुलगी


कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *