👁 5 Views

मंगळवेढा : संतापजनक , विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल

 

एक 35 वर्षीय विवाहित महिला शेताच्या बांधावर गवत काढत असताना तीचा पदर ओढून तु मला खूप आवडतेस असे म्हणून


तीच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी विठ्ठल भोजाप्पा बिराजदार (रा.नंदूर) याच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.


याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील पिडीत महिला तथा फिर्यादी दि.28 रोजी दुपारी 12.30 च्या दरम्यान नंदूर येथील शेतात बांधावरील गवत काढत असताना

वरील आरोपीने येवून फिर्यादीचा पदर ओढून तू मला खूप आवडतेस असे म्हणून अंगाशी झोंबाझोंबी करून मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करीत असताना


रोडवरून जाणार्‍या गाडीचा आवाज ऐकून आरोपी तेथून निघून जाताना तु ही घटना कोणाला सांगितली तर तुला जीव मारून टाकेन

अशी धमकी दिल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.याचा अधिक तपास पोलिस हवालदार कोळी हे करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *