👁 13 Views

युगपुरुष छत्रपती शिवरायांची बरोबरी कोणीही करू शकत नाही; भाजपाने रायगडावर छत्रपतींसमोर नाक घासुन माफी मागावी- धनंजय मुंडे

Pandharpur Live : 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणाऱ्या पुस्तकावरून भाजपाला मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरं जावं लागत आहे. विरोधी पक्षांच्या नेते मंडळींसह सोशल मीडियाद्वारे देखील नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महाविकास आघाडी  सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान मोदींची थेट तुलना करणारे पुस्तक प्रकाशित करून भाजपच्या नेत्यांनी मराठी जनाच्या भावना दुखावल्या आहेत. युगपुरुष छत्रपती शिवरायांची बरोबरी कोणीही करू शकत नाही, हा अट्टहास करू पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, असा इशारा मुंडे यांनी भाजपाला दिला आहे.

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी टीका करताना भाजपने रायगडावर जाऊन नाक घासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची माफी मागितली पाहिजे असं म्हटलं आहे.
धनंजय मुंडे याच्यासह शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते राजीव सातव, राज्यातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील या मुद्यावरून भाजपावर जोरदार टीका केली आहे. शिवाय, या पुस्तकावर तात्काळ बंदी आणून भाजपाने माफी मागावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे.

याआधी धनंजय मुंडे यांनी ट्विट करतही आपला संताप व्यक्त केला होता. त्यांनी म्हटलं होतं की, “हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान मोदींची थेट तुलना करणारे पुस्तक प्रकाशित करून भाजपच्या नेत्यांनी मराठी जनाच्या भावना दुखावल्या आहेत. युगपुरुष छत्रपती शिवरायांची बरोबरी कोणीही करू शकत नाही, हा अट्टहास करू पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही”.
हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान मोदींची थेट तुलना करणारे पुस्तक प्रकाशित करून भाजपच्या नेत्यांनी मराठी जनाच्या भावना दुखावल्या आहेत. युगपुरुष छत्रपती शिवरायांची बरोबरी कोणीही करू शकत नाही, हा अट्टहास करू पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही.
View image on Twitter

361 people are talking about this

जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचं रविवारी प्रकाशन करण्यात आलं. दिल्ली भाजपाच्या कार्यालयात पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी हे नेते उपस्थित होते. या पुस्तकाचे वृत्त सोशल माध्यमातून पसरल्यानंतर भाजपावर सगळीकडून टीका केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी होऊ लागली आहे.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *