👁 10 Views

सविस्तर बातमी- काल चंद्रभागेत कोसळलेला ट्रक सापडला… ट्रकमधील दोघांच्या मृत्यूची शक्यता

Pandharpur Live : 
काल अहिल्या पुलावरून चंद्रभागेच्या पात्रात कोसळलेला ट्रक MH-45 AF-9955 सापडला असून या गाडीत मिळालेल्या ओळखपत्र आणि कागदपत्रावरून गाडीतील वाहुन गेलेल्या एका इसमाचे नाव  सादिक जहांगीर पठाण (मूळ राहणार दिल्ली)  सध्या रा. कुर्डूवाडी असे असण्याची व तोच ट्रक ड्रायव्हर असल्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. गाडीतील ड्रायव्हर व सहकारी अशा दोघांचा बुडून मृत्यू झाला असल्याची भीती निर्माण झाली आहे. 
पोलीस व महसूल प्रशासनाने गाडीतील ड्रायव्हर व त्याचा सहकारी  यांना शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करूनही अद्याप  कोणाचाही शोध लागलेला नाही. ट्रक वेगाने असल्याने पुलावरून खाली नदीपात्रात कोसळलेल्या ठिकाणापासून 30 ते 40 फूट पुढे पाण्यात सापडला आहे. वाहुन गेलेल्या ड्रायव्हर व सहप्रवाशाचे शोधकार्य सुरू आहे.

काल रात्री सदर ट्रक नदीपात्रात कोसळल्याचे समजताच प्रांताधिकारी सचिन ढोले व तालुका पोलिस निरीक्षक किरण आवचर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. जलद गतीने शोधकार्य सुरू केल्याने आज बुडालेला ट्रक सापडला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *