👁 9 Views

पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती साजरी

Pandharpur Live : 

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले शुभहस्ते,  स्वामी विवेकानंद केंद्राचे मार्गदर्शक शिवदास भिंगे गुरुजी, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी शिक्षण समिती सभापती रेणुका घोडके, स्वच्छता व वैद्यकीय आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, नगरसेविका करुणा आंबरे, शकुंतला नडगिरे, नगरसेवक सुजितकुमार सर्वगोड, डीराज सर्वगोड, सामाजिक कार्यकर्ते निलेश आंबरे, अमोल डोके, नरेंद्र डांगे, इब्राहिम बोहरी, धर्मराज घोडके तसेच सचिन लोकरे, विनोद भरते, प्रताप चव्हाण, सुनिल कोरे, मंदार केसकर, महेश भोसले, सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *