👁 13 Views

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला विविध विकास कामांचा आढावा

पुणे, दि. 17 :  जिल्ह्यात शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात आलेली विविध प्रलंबित आणि प्रस्तावित विकास कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घ्यावा. कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत याची संबधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केल्यातसेच जिल्हयातील विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशीही ग्वाही त्यांनी दिली.
          शासकीय विश्रामगृह येथे उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्हयातील विविध विकास कामांचा आणि प्रकल्पांचा आढावा घेतलायावेळी खा.डॉ अमोल कोल्हे, आदिलीप मोहिते             आसुनिल टिंगरे,चेतन तुपे, आ. अतुल बेनकेविभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकरजिल्हाधिकारी नवल किशोर राममहापालिका आयुक्त सौरभ रावजिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटीलअतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवालपीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमारसोलापुरचे जिल्हाधिकारी   आर.बीभोसलेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधवनिवासी उपजिल्हाधिकारी डॉजयश्री कटारेउपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुखसार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सदाशिव साळुंखेउपविभागीय अधिकारी जितेंद्र डूडीमहामेट्रो कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षीत आदी उपस्थित होते.
            यावेळी पुणे महानगर विकास प्राधिकरणा अंतर्गत असलेल्या शिवाजीनगरहडपसर महामेट्रो तसेच पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कामाचा सविस्तर आढावा घेताना कामासाठी लागणारा कालावधीकामाची सद्यस्थितीभूसंपादनाबाबतच्या अडचणी आदी विषयाबाबत माहिती घेत मेट्रोच्या कामाला गती देण्याचे निर्देश श्री पवार यांनी दिले.
        पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेत श्री पवार यांनी पुणे शहरात विकासकामे करताना दीर्घकालीन विचार करणे आवश्यक असून भौगोलिक विचार करून विकासकामाचे नियोजन करण्याच्या सूचना केल्यापुणे शहाराच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासनाकडून आवश्यक निधीची गरज लक्षात घेत अर्थसंकल्पात तरतूद करणार असल्याचेही त्यांनी सांगितलेतसेच राष्ट्रीय नदी संवर्धन योजने अंतर्गत  मुळामुठा नदी संवर्धन प्रकल्पाबाबतही त्यांनी सविस्तर आढावा घेतलाभामा आसखेड प्रकल्पाच्या कामासदंर्भात श्री पवार यांनी सविस्तर माहिती घेत याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही सबंधित अधिकायांना केल्यापुणे महानगरपालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या घनकचरा व्यवस्थापनासंदर्भातील स्थितीही श्री पवार यांनी जाणून घेतली.
        श्री क्षेत्र देहूआळंदीपंढरपूरभंडारा डोंगरनेवासा पालखीतळ मार्ग विकासकार्यक्रमाबाबत विभागीय आयुक्त डॉदिपक म्हैसेकर यांनी सविस्तर माहिती दिलीयामध्ये देहू,आळंदी भूसंपादनपंढरपूर येथील वाळवंट सुधारणा कार्यक्रमपालखी मुक्काम व रिंगण विकासपालखी तळ भूसंपादनआदि विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आलाराज्य शासनाकडून केलेली कामे समाधानकारक असून नागरी सुविधा देणे ही शासनाची जबाबदारी आहेआपण सर्वांनी मिळून या सुविधांची जपवणूक करणे आवश्यक असल्याचे सांगून संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासाठी तसेच आवश्यक सोयी सुविधेसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाहीअशी ग्वाही श्री पवार यांनी दिली.
          चाकण शहराच्या विकास आराखड्याबाबत आढावा घेताना चाकण शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राज्य शासन आपल्या बरोबर आहेशहर विकासाचा आराखडा तातडीने सादर करण्याच्या सूचना देत शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना श्री पवार यांनी दिल्या.
          छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रम आयोजनाबाबतही उपमुख्यमंत्री पवार यांनी आढावा घेतलायामध्ये शिवनेरीचे सुशोभिकरण व हरितीकरण तसेच शिवजंयतीच्या आयोजनासंदर्भात जिल्हाधिकारी राम यांनी सविस्तर माहिती दिलीशिवनेरी च्या विकासासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करणार असल्याचेही पवार यांनी सांगितलेयावेळी विविध विभागाचे अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *