👁 11 Views

कर्मयोगी इंजिनिअरींग मध्ये “वाईस रायडर” या विषयावर व्याख्यान

“कर्मयोगी इंजिनिअरींग कॉलेज व रोटरी क्लब यांचे संयुक्त विद्यमाने “वाईस रायडर” या विषयांवरील व्याख्यानाचे कर्मयोगी इंजिनिअरींगच्या सभागृहामध्ये आयोजन करण्यात आले.”

      आजच्या युगात वाहन चालविताना सुरेक्षेचे नियम माहिती असणे हे अनिवार्य झाले आहे कारण सुरक्षेत थोडीसी चूक ही आपल्या जीवास घातक ठरणार आहे. तरी सर्वांनी मिळून वाहतुक सुरक्षेची शपथ घेणे आवश्यक आहे…………        श्री मिलिंद वाघ सर(संचालक रोटरी क्लब, पंढरपूर) 

           दि.11 जानेवारी 2020 रोजी कर्मयोगी इंजिनिअरींग कॉलेज व रोटरी क्लब पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी इंजिनिअरींग कॉलेजच्या सभागृहात वाईस रायडर या विषयावर कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील, प्रमुख पाहुणे श्री विश्वास आराध्ये, श्री संजय कपडेकर व श्री मिलींद वाघ (संचालक रोटरी क्लब, पंढरपूर) यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री मुडेगांवकर (उपप्राचार्य) यांनी केले.
      यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री विश्वास आराध्ये यांनी केले. श्री विश्वास आराध्ये यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून आतापर्यंत केलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
       याप्रसंगी प्रमुख अतिथी श्री मिलींद वाघ यांनी वाहन चालविताना कोणत्या संरक्षक बाबींची दक्षता घ्यायची आहे याबद्दलचे मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. आजच्या युगात वाहनांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे यामुळे वाहन चालविताना खबरदारी घेणे आपल्या हिताचे आहे यामध्ये हेल्मेटचा वापर करणे असो किंवा सिट बेल्टचा वापर करणे असो या संबंधीत घटकांचा वापर वेळोवेळी केल्यास अपघाताचे प्रमाण निश्चितच कमी होणार आहे. सुरक्षित वाहन चालविताना आपण आपल्या डोक्यातील विचार तात्पुरते बाजुला ठेवून तसेच वेगावर नियंत्रण ठेवून वेळेत प्रवासाला सुरुवात करण्याचा उपदेश या अतिथींनी विद्यार्थ्यांना दिला.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील यांनी विद्यार्थ्यांना 11 जानेवारी ते 18 जानेवारी या वाहतुक सुरक्षा सप्ताह शपथ घेवून पाळण्यासाठी आवाहन केले. तसेच राष्ट्राच्या हितासाठी पब्लिक ट्रान्स्पोर्ट चा वापर जास्तीत जास्त करण्याचेही यावेळी सांगितले. 
           कार्यक्रमाचे आभार प्रा.देशमाने ए.ए.यांनी मांडले यावेळी कार्यक्रमास संस्थेचे रजिस्ट्रार श्री गणेश वाळके, प्रा.पांचाळ आर.जे., प्रा.कुलकर्णी एस.एम., प्रा.बाबर ए.टी, प्रा.सावेकर एस.जे.आदी मान्यवर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  फोटो ओळ – मान्यवरांचा सत्कार करताना कर्मयोगी इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील सर व   प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *