👁 10 Views

पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाच्या वतीने भाळवणी येथे वृक्षारोपण

○ राष्ट्रीय सेवा योजनेतुन सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालय व पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भाळवणी येथे राष्ट्रीय सेवा योजना वतीने श्रमदान शिबिर आयोजित करण्यात आले असुन या श्रमदान माध्यमातून सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी ५० हून अधिक वृक्षांची लागवड केली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
  पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय हे गुणवत्तेबरोबरच  सामाजिक बांधिलकी म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण करण्यासाठी वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली भाळवणी (ता. पंढरपूर) येथे मंगळवारी ग्रामपंचायत च्या जागेत ५० अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. दरम्यान यावेळी सुदाम वसेकर यांचे वृक्षारोपण,  वृक्षसंवर्धन व वृक्षदान या विषयावर अतिशय महत्वपूर्ण माहिती स्वरूपात व्याख्यान संपन्न झाले.
   सिंहगड महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांनी भाळवणी गावातील नागरिकांना विश्वासात घेऊन स्वच्छतेचे महत्व सांगून ठराविक धार्मिक ठिकाणे, मंदिर परिसर स्वच्छ केला.
  भाळवणी येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून श्रमदान शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. सुमीत इंगोले सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.


फोटो- सिंहगड चे विद्यार्थी व प्राध्यापक वृक्षारोपण करताना

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *