👁 6 Views

रोटरॅक्ट क्लब सिंहगड कॉलेज मध्ये टीम ट्रेनिंग

पंढरपूर: प्रतिनिधी

रोटरी क्लब पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी “रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३१३२” यांचे टीम ट्रेनिंग एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मध्ये आयोजित करण्यात आले होते. ही कार्यशाळा मोठ्यात उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती पंढरपूर रोटरी क्लबचे अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.


 या कार्यक्रमाचे उद्घाटन  डी.आर. आर. रो. रवि भक्कड, डी. एस. ए. रो. रिद्धी कारवा, डी एस. ई.  रो. सौरभ लोहिया, रो.  वैभवी पाटिल, रोटरॅक्ट क्लब सिंहगड कॉलेजचे अध्यक्ष रो. समृद्धी ताठे, सचिव रो. विश्वजीत कस्तुरे, रोटरी क्लब पंढरपूरचे सचिव सचिन भिंगे आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.


दरम्यान रोटरॅक्ट क्लब सिंहगड कॉलेज कडून उपस्थित मान्यवरांचे गुलाबाचे झाड देऊन स्वागत करण्यात आले.

  या कार्यशाळेत लाभलेले मान्यवर रो. सागर खराडे आणि रो. संतोष लोखंडे यांनी कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी रोटरॅक्ट क्लब सिंहगड कॉलेज, रोटरी क्लब पंढरपूर व एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मधील कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.


  या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रद्धा कुलकर्णी व ओंकार तनपुरे यांनी केले तर आभार रो. विश्वजीत कस्तुरे यांनी मानले.


फोटो ओळी: 

“रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३१३२” यांचे टीम ट्रेनिंग या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवर

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *