कोल्हापूर: माजी सपंच पतीच्या वाढदिनीच माजी सरपंच पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात घडली.
जाचाला कंटाळून केली आत्महत्या
दरम्यान, सुप्रिया यांचे वडील दिली पाटील यांनी माहेरकडून पैसे आणण्यासाठी आणि चारित्र्याच्या संशयातून शारिरीक आणि मानसिक त्रास देऊन तसेच शिवीगाळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुप्रिया आणि बाजीराव हे नात्याने पती पत्नी आहेत. पती बाजीरावने 2012 पासून सुप्रिया यांना माहेरकडून पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता. यासाठी सातत्याने चारित्र्याचा संशय घेऊन मानसिक आणि शारिरीक त्रास दिला जात होता. त्यामुळे सातत्याने होणाऱ्या जाचाला कंटाळून हणबरवाडीमधील राहत्या घरी गळ्याला गळफास घेत आत्महत्या केली.
पतीच्या वाढदिनशीच आत्महत्या
मिळालेल्या माहितीनुसार बाजीरावचा शनिवारी (1 एप्रिल) वाढदिवस होता. मुले शाळेल्या गेल्यानंतर सुप्रिया यांनी पतीला वाढदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर बाजीराव वैयक्तिक कामासाठी बाहेरगावी निघून गेले. यावेळी घरी कोणी नसल्याने सुप्रिया यांनी गळफास घेतला. काही महिला घरी गेल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डाॅक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या माहेरी याबाबत माहिती देण्यात आल्यानंतर माहेरकडील आम्ही रुग्णालयात पोहोचल्याशिवाय मृतदेह ताब्यात घ्यायची नाही अशी भूमिका घेतली. ते आल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. वडिल बाजीराव यांनी स्वत: इस्पूर्ली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.



