👁 12 Views

किल्ले धारुर नगरपालिकेच्या अन्यायाविरुध्द लहान मुलांसह महिलेचे आमरण उपोषण… प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष!

 Pandharpur Live-

बीड .( प्रतिनिधी ) किल्ले धारूर नगरपालिकेच्या अन्यायाविरुध्द एका महिलेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लहान मुलांसह आमरण उपोषण सुरु आहे. गेल्या 3 वर्षापासुन सदर महिला ही किल्ले धारुर नगरपालिकेमध्ये सेवक या पदावर काम करत आहे. परंतु नगरपालिका प्रशासनाने कोणतीही पुर्वसुचना न देता कामावरुन कमी केले असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. याच कारणामुळे आपल्या दोन लहान मुलांसह सदर महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसली असूण अद्यापही महिलेस न्याय मिळाला नसल्याचे अथवा प्रशासनाने कोणतीही दखल घेतले नसल्याचे समजते.



पंढरपूर लाईव्हला मिळालेल्या माहितीनुसार सौ.पार्वती मुंडे यांना कसलीही पूर्वसुचना न देता त्यांच्यावर मुलाबाळासह उपासमारीची वेळ आल्यामुळे न्याय मागण्यासाठी जिल्हाधीकारी कार्यालया समोर त्या बेमुदत उपोषणास बसल्या आहेत .
   धारूर नगर पालिकेमध्ये त्या  दि 2-7-2016 पासुन म्हणजेच  गेल्या 3 वर्षांपासुन सेवक या पदावर कार्यरत होत्या. परंतु त्यांना कसलीही पुर्वसुचना न देता व कोणतेही कारण न सांगता कामावरुन काढुन टाकले आहे. त्यांच्या कामाचे मागील चार महिण्याचे वेतनदेखील थकीत आहे. त्यांना अद्यापही पालिकेने कामावर घेतेले नसल्ययाने त्यांच्या कुटूंबावर  उपासमारीची वेळ आलेली आहे.

नगर पालिका प्रशासनाला वेळोवेळी कामावर घेण्याची विनंती केली परंत मुख्याधिकारी यांनी कार्यालयातून अपमानीत करून व माझा अवमान करून हाकलुन दिले. दि. 5 – 11- 2019 रोजी बे ायदेशिरपणे कामा रून कमी केले आहे. परत मला कामावर घ्यावे म्हणुन मा. जिल्हाधीकारी यांच्यासह संबंधीत शासकिय कार्यालयाला दि 20- 1 – 2020 रोजी निवेदन देवून मला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली परंतु प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही .
परत मी 17 -2-2020 ला जिल्हाधीकारी कार्यालय बीड, या ठिकाणी आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय निवेदना द्वारे कळविला असल्याची माहिती सदर महिलेने दिली आहे. जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही.  असा इशाराही त्यांनी दिला आहे.

एक महिला आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेली असताना प्रशासनाचे याकडे सपशेल असलेले दुर्लक्ष निश्‍चितच निंदणीय आहे. संबंधीत प्रशासकीय अधिकार्‍यांनी याकडे तातडीने लक्ष घालुन योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक आहे. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *