👁 12 Views

पंढरपूर सिंहगड कॉलेज मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी… शिवजयंतीचा खर्च टाळून पालवी या सामाजिक संस्थेस साहित्य व खाऊ वाटप

 Pandharpur Live –
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात छञपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून पालवी या सामाजिक संस्थेत जाऊन साहित्य व खाऊ वाटप केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

   19 फेब्रुवारी या दिवशी छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सिंहगड अभियांत्रिकी  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पंढरपूर येथील शिवाजी चौक येथून मशाल घेऊन येऊन महाविद्यालयात शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. श्याम कुलकर्णी, अकॅडमी डीन डॉ. रविंद्र व्यवहारे, डॉ. संपत देशमुख, डॉ. बाळासाहेब गंधारे, प्रा. उमेश घोलप, प्रा. सोमनाथ कोळी, प्रा. शिवाजी पवार, प्रा. दिपक कोष्टी, प्रा. अमोल जगदाळे आदी सह महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    महाविद्यालयात छञपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी पालवी या सामाजिक संस्थेमध्ये जाऊन छञपती शिवाजी महाराज यांच्या विषयी डॉ. रविंद्र व्यवहारे व डॉ. स्वानंद कुलकर्णी सह महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उपस्थितांना प्रबोधन केले.




 पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती औचित्य साधून जयंतीचा खर्च इतरञ खर्च न करता त्या खर्चातुन सामाजिक बांधिलकी म्हणून पालवी संस्थेस सांऊड सिस्टम व मुलांना मिठाई स्वरूपात खाऊ वाटप करण्यात आला.

 यावेळी पालवी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मंगलताई शहा यांनी सिंहगड संस्थेचे आमच्या पालवी संस्थेला नेहमी सहकार्य असते. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सिंहगड संस्था खुप आदर्श व उत्कृष्ट पद्धतीने कामकाज चालवत असल्याचे मत मंगलताई शहा यांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी डिम्पल घाडगे यांनी मनोगत व्यक्त केले

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील अकॅडमी डीन डॉ. रविंद्र व्यवहारे, डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. श्याम कुलकर्णी, प्रा. उमेश घोलप, प्रा. शिवाजी पवार, प्रा. अमोल जगदाळे, प्रा. ॠषिकेश धोकटे, प्रभाकर शिंदे, गणेश वसेकर आदींनी सह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीनी परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *