👁 14 Views

चंद्रभागेत बुडून तरूणाचा मृत्यू



पंढरपूर लाईव्ह वृत्त-
आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास चंद्रभागेच्या पात्रात आंघोळीला गेलेल्या एका तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत पंढरपूर लाईव्ह ला समजलेल्या माहितीनुसार विनोद गायकवाड (वय अंदाजे 25), रा. नांदेड  हा तरूण चंद्रभागेच्या पात्रात पोहत होता. पाण्याबाहेर येताना मात्र खड्ड्याचा अंदाज न आल्याने एका खड्डयात बुडून तो मयत झाला.

सदर तरूणाचा मृतदेह कोळी समाजातील बांधव सुरज कांबळे, सुनील कोताळकर,वैभव माने,ओंकार संगीतराव,विट्ठल करकमकर, नानासाहेब करकमकर यांनी बाहेर काढला. तरूणाचा मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेतला असुन अधिक तपास सुरू आहे.

सदर तरूण पंढरीतील राजपूत मंगल कार्यालयातील एका विवाहसोहळ्यासाठी आल्याचे समजते.



Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *