👁 12 Views

चंद्रभागेच्या वाळवंटात आढळला 69 वर्षीय इसमाचा मृतदेह



पंढरपूर लाईव्ह वृत्त-
आज सकाळी चंद्रभागेच्या वाळवंटात उध्दव घाटानजीक एका 69 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला.

पंढरपूर लाईव्ह ला समजलेल्या माहितीनुसार बाळु तुळशीराम डोके (वय 69), रा
 एकलहरे, कळंब, पुणे, या इसमाचा मृतदेह उध्दव घाटानजीकच्या वाळवंटात आढळुन आला. सदर इसमाच्या खिशात मतदान कार्ड, विम्याची कागदपत्रे आढळून आली. त्याच्या हातात मोकळा ग्लास आणि शेजारी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. यावरून अतीमद्यपान केल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेतला असुन अधिक तपास सुरू आहे. 


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *