👁 10 Views

सावता परिषद युवा जिल्हाध्यक्ष पदी सयाजी बनसोडे

            मंगळवेढा(प्रतिनिधी)- समाजकार्यासाठी समाज संघटन हे ब्रीद वाक्य घेऊन स्थापन झालेल्या सावता परिषद या संघटनेच्या नुकत्याच संस्थापक कल्याणकाका आखाडे यांनी नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.यामध्ये मंगळवेढा तालुका अध्यक्ष सयाजी बनसोडे यांच्या कार्याची दखल घेऊन सावता परिषदचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे आणि प्रदेश कार्यकारणी यांनी सावता परिषदेच्या सोलापूर जिल्ह्याच्या युवक आघाडी जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.




         जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते म्हणाले की कल्याणराव आखाडे आणि मुख्य संघटक संतोष राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात सावता परिषदेची आणखी ताकत वाढवणार असून त्यांनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार आहे त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र जल्लोष व्यक्त केला जात आहे व त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यानी सावता परिषद युवक मंगळवेढा तालुका अध्यक्ष म्हणून तालुक्यातील संघटनेच्या माध्यमातून विविध कामे केली आहेत. एसटी चालू करण्यासाठी असो की रस्ता दुरुस्ती करणे असे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सयाजी बनसोडे यांचा मोलाचं योगदान आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *