👁 13 Views

खेडभाळवणीत शिवजयंती निमित्ताने 51 जणांचे रक्तदान

      Pandharpur Live- खेडभाळवणीत  शिवजयंती निमित्ताने शिवप्रेमी तरूण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिरात शिवप्रेमीनी  रक्तदान केलं .

        पंढरपूर  ब्लड बॅक याच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले असुन रक्तदान हे श्रेष्ठदान हे समजुन 51 दात्यांनी रक्तदान केले. या शिबिरासाठी धाराशिव साखर कारखाना युनिट 1 , 2 , 3 चे चेअरमन अभिजित पाटील साहेब यांनी उद्घाटन  केले .यावेळी उद्घाटन प्रसंगी आज समाजाला रक्तदात्यांची गरज आहे हे समाज कर्तव्य प्रत्येकाने पूर्ण केलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं.  यावेळी रक्तदात्यास हेल्मेट देण्यात आले .

          या शिव जयंतीसाठी सर्व श्री. ऋषिकेश पवार , नितीन पवार , शहाजी पाटील , पिंटू साळुंखे ,महेश ,दादा,माऊली,आकाश,राजु,शंकर,आप्पा,गजानन,सतोश,सचिन,बाबासाहेब,तानाजी,समीर,प्रविण,विकास,सागर,अनिल,शिवाजी,आतुल, विकास , गणेश   आदि शिवप्रेमी  कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले असुन मोठ्या उत्साहात रक्तदानाचा  कार्यक्रम  पार पडला .

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *